आपला विदर्भगडचिरोली

दक्षिण गडचिरोलीत विजय -अजय चा शंखनाद… हजारो कार्यकर्त्यांच्या पक्ष प्रवेशाने काँग्रेसला ला मिळाले बळ…….

गडचिरोली / अमोल कोलपाकवार

आलापल्ली येथे रविवारी भव्य जाहीर काँग्रेस पक्ष प्रवेश सोहळा पार पडला या पक्ष प्रवेशात आलापल्ली येथे विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश झाला . आलापल्ली येथे विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांचे स्वागत आदिवासी पारंपरिक नृत्य ढोल ताशांचा गजरात फटाक्याच्या आतिषबाजीने सार्वजनिक विश्राम गृह पासून ते क्रीडा संकुल पर्यंत भव्य रॅली काढुन करण्यात आला. क्रीडा संकुल येथे भव्य असे सभा मंडपात हजारो संख्यात ५ ही तालुक्यातील जनता उपस्थित होती. या कार्यक्रमात विजय वडेट्टीवार यांनी भाषणातून अनेक नेत्यांवर टीका केली. गडचिरोली काँग्रेस पक्षाने ज्यांना ज्यांना संधी दिली त्यांनी आजपर्यंत पक्षाला धोका दिली आहे. त्यामुळेच अहेरी विधानसभा क्षेत्रात काँग्रेस कमकुवत झाली होती. मात्र अजय कंकडालवार आता ही जागा भरून काढणार असून विजय आणि अजय ही जोडी आता कमाल करणार आहे. एवढेच नव्हेतर येत्या विधानसभा निवडणुकीत अहेरी विधानसभा क्षेत्रावर काँग्रेसचा झेंडा फडकणार असल्याचा विश्वास विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.माजी आ.डॉ. नामदेव उसेंडी म्हणाले केंद्र आणि राज्य सरकार मुळे जनता त्रस्त झाली आहे. महागाई वाढत आहे, जातीय तेढ निर्माण करीत आहे. सोबतच त्यांनी विकास कामांवरून व दयनीय झालेल्या रस्त्यांचा दाखला देऊन मंत्री धर्मराव बाबा आत्राम, खा. अशोक नेते यांच्यावरही आरोप केले. डॉ. नामदेव किरसान म्हणाले की भाजप सरकार फोडाफोडीचे राजकारण करते आणि ईडी व सीबीआयचे भय दाखवून अनेकांना भाजप मध्ये घेत आहेत. महेंद्र ब्राम्हणवाडे म्हणाले की दीपक दादा आत्राम यांना मागील निवडणुकीत ऐन वेळेवर काँग्रेस तर्फे आम्ही तिकीट दिली. मात्र, ते आमच्याशी कधीच एकनिष्ठ राहले नाही ज्या मेडिगड्डा प्रकल्प विरोधात तेलंगाणाच्या मुख्यमंत्र्यांना शिव्या देत होते आता फक्त अर्थकारण साठी त्याच बीआरएसच्या मुख्यमंत्र्यांसोबत त्यांच्या पक्षात गेले.

अजय कंकडालवार म्हणाले की मी ग्रामपंचायत सदस्य ते जिल्हा परिषद अध्यक्ष बनलो. यात मला नेहमीच काँग्रेसची साथ मिळाली. आदिवासी विद्यार्थी संघाच्या सभेत माजी आमदाराने मला अत्यंत दुय्यम दर्जाची वागणूक दिली आज तेच दुसऱ्या पक्षात जाऊन आदिवासी जनतेची दिशाभूल करत आहे. मी तळागळातला कार्यकर्ता असून प्रत्येक गावात जातो. मात्र काही लोकं घरातून न निघताच स्वतःला आदिवासी नेते म्हणत आहेत. मी गोर गरिबांच्या पाठीशी असल्याने जनता माझ्या सोबत आहे. त्यामुळेच नुकतेच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत १८ पैकी १३ ग्रामपंचायत निवडून आले. विविध निवडणुकीत सर्व पक्ष एक होऊन माझ्या विरोधात षडयंत्र रचतात. मात्र जनता माझ्या पाठीशी आहे आता फक्त विजय वडेट्टीवार यांची साथ हवी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.२० वर्षापासून आदिवासी विद्यार्थी संघटनेमध्ये कार्यान्वित माजी जिल्हा परिषद अध्यक्ष

अहेरी कृषी बाजार समितीचे सभापती अजय कंकडालवार ५ तालुक्यात आपले वीस वर्षापासून जिल्हा परिषद अध्यक्षाच्या माध्यमातून रोड रस्ते विकासाची कामे यांच्या हातातून झालेली आहे पाचही तालुक्यात यांचा राजकीय छाप आहे असे दिग्गज कार्यकर्ता म्हणून काँग्रेसच्या पदरात पडले विजय भाऊ च्या खांद्याला खांदा लावून लोकहिताचे कामे करू असे म्हणाले या जिल्ह्याचा सर्वांगीण विकासासाठी आम्ही सर्वांनी मिळून कार्य करू २०२४ चा निवडणुकीत आमचे काँग्रेस चे आमदार लढवून आनू असे भाषणातून बोलले. काँग्रेसमध्ये जाहीर अहेरी विधानसभा क्षेत्रातील आलापल्ली येथे काँग्रेसचा पक्ष प्रवेश कार्यक्रमात यावेळी काँग्रेसचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, काँग्रेस कमिटीचे महासचिव डॉ. नामदेव किरसान, मनोहर पोरेटी, विश्वजित कोवासे, महिला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड.कविता मोहोरकर, डॉ. नितीन कोडवते, डॉ. चंदा कोडवते, सगुणा तलांडी, रवी शहा, डॉ. निसार हकीम, सोनाली कंकडालवार, सेवानिवृत्त वन संरक्षक एच.जी. मडावी, आविस नेते नंदू नरोटे, बानय्या जणगाम सह सर्व काँग्रेस तालुका अध्यक्ष व आविस पदाधिकारी उस्थित होते.

error: Content is protected !!