आपला विदर्भवर्धा

महाराष्ट्र शासनाच्या तर्फे विकास भवन वर्धा येथे राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा..

वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- गजानन पोटदुखे

दिनांक :-26 डिसेंबर 2023

24 डिसेंबर रोजी महाराष्ट्र राज्याचे वतीने संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात येतो.

यानिमित्ताने वर्धा शहरात तहसील कार्यालयाच्या वतीने विकास भवन वर्धा येथे राष्ट्रीय ग्राहक दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती उषा फाले अध्यक्ष अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषद वर्धा.प्रमुख वक्ते श्री.अजय भोयर सचिव अ.भा.ग्रा.क.वि‌.शाखा. वर्धा.शालीकराम भराडी जिल्हा पुरवठा अधिकारी वर्धा.रमेश कोळपे तहसीलदार वर्धा.किशोर मुटे सुरेश पट्टेवार अनिल मिश्रा विनोद पोटे ॲड प्रिती साहू, प्रज्वल पाथरे पुरवठा निरीक्षक अधिकारी वर्धा महेश थेरे यांनी स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व यानंतर दीपप्रज्वलन करण्यात आले होते. यानंतर ग्राहक गीत सौ.कल्याणी मुटे यांनी सादर केले.आणि कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी जागतिक दिवस कोणता वेळी लागू झाला आणि 2019 चा कायदा किती महत्वाचा आहे याबाबत ॲड.प्रिती साहू यांनी कायदा बदल माहिती सांगितलेली आहे आणि कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन तहसीलदार रमेश काळपे वर्धा यांनी केले होते.

error: Content is protected !!