आपला विदर्भवर्धा

स्पर्धेत यश संपादन करण्यासाठी सराव अत्यंत महत्त्वाचा,खा. रामदास तडस…..

वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- गजानन पोटदुखे

दिनांक :- 25 डिसेंबर 2023

सिंधी प्रीमियर लीग सीझन 9 ची सुरुवात मोठ्या धूमधडाक्यात.

वर्धा: कोणतीही खेळ किंवा स्पर्धा असो, यासाठी एकाग्रता आणि वेळेचे महत्त्व आवश्यक आहे, कुस्ती, क्रीकेट तसेच इतर कोणतेही खेळ असो, या स्पर्धेमध्ये आपण एक व्हिजन ठेवून काम केले पाहिजे, तसेच स्पर्धेत यश संपादन करण्यासाठी सराव अत्यंत महत्त्वाचा असतो. जे खेळाडु नित्यनियमित सराव करतात, तेच विजयी होतात असे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी सिंदी प्रिमीअर लीग प्रसंगी व्यक्त केले.

जिल्हा क्रीडा संकुल वर्धा येथे सिंदी प्रिमीअर लीग सिझन 09 चा उद्घाटन समारंभ महाराष्ट्र भाजपा व्यापारी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा, वर्ध्याचे खासदार रामदास तडस यांच्या शुभहस्ते संपन्न झाला, कार्यक्रमाला आमदार डॉ. पंकज भोयर, हिंगणघाटचे माजी नगराध्यक्ष प्रेम बसंतानी, प्रताप मोटवानी, राजस्थान रॉयल्सचे संघ व्यवस्थापक रोमी बिंधार, रामचंद्र असरानी, भाजपा जिल्हाध्यक्ष सुनिल गफाट, प्रमोद मुरारका, डॉ. अभ्युदय मेघे, पवन कुकरेजा, रमन लालवानी, सुरेश पंजवानी, सुरेश आहुजा, प्रदीप जग्यासी, राम डोडानी उपस्थित होते.

क्रीकेट ची लोकप्रीयता मोठया शहरासोबत ग्रामीण भागात वाढत आहे, वर्धा शहरात मोठया प्रमाणात सिंदी प्रीमिअर लीगचे आयोजन करण्यात आले आहे. या लीगमुळे वर्धा शहरातील व ग्रामीण भागातील खेळाडूंना स्वतः ला सिद्ध करण्याचं नवं व्यासपीठ मिळणार असल्याचे यावेळी महाराष्ट्र भाजपा व्यापारी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा म्हणाले.यावेळी उपस्थित मान्यवरांनी समोयोचीत मार्गदर्शन केले.

सिंधी प्रीमियर लीग सीझन 9 ची सुरुवात मोठ्या धूमधडाक्यात झाली, दरवर्षी प्रमाणे या वर्षी वर्षी देखील सीए मुकेश हिंदुजा यांच्या नेतृत्वात एसपीएल कमिटी आणि आदरणीय सिंधी जनरल पंचायत, वर्धा याच्या व्दारा आयोजित सिंदी प्रिमीअर लीग स्पर्धा रविवार, 24 ते शुक्रवार, 29 डिसेंबर 2023 या कालावधीत आयोजित करण्यात आलेली आहे. या स्पर्धेत बेटा 11, न्यु तनिश्क 11, लालवानी लायनस, मोहनानी वारीअर, ओमशिव गौरी निधी बॅंक, प्रिया पॅलेस या 06 टीमचा सहभाग आहे,

कार्यक्रमाचे प्रास्तावीक महेश भाटीया यांनी केले, कार्यक्रमाचे संचालन सीए मुकेश हिंदुजा व उपस्थिताचे आभार आकाश दुबानी यांनी मानले, कार्यक्रमाला रवी भाटीया, योगेश पंजचानी, सुनील मोहनानी, सीए बंटी जयसिंघानी, जीतू भाटिया, मोठया संख्येने खेळाडु व नागरीक उपस्थित होते

error: Content is protected !!