दि.25 डिसेंबर 2023 ला ख्रिसमस सणाच्या पावन पर्वावर सुट्टीच्या दिवशीं जि. प प्राथमिक शाळा रुस्तमपूर च्या प्रांगणात शाळेच्या वतीने बाल आनंद मेळाव्याचे आयोजण करण्यात आले होते.आनंद मेळाव्यात विद्यार्थी-विद्यार्थिनींनी अतिशय उत्साहाने खूप छान छान चविष्ट व चटकदार खाद्यपदार्थ बनवून आणले होते. स्टॉलची मांडणी, विविध पदार्थांची विक्री, खरेदी व विविध पदार्थांचा आस्वाद घेण्याचा आनंद विद्यार्थ्यांसह पालक व ग्रामस्थांनी लुटला.सकाळी बाल आनंद मेळाव्याचे उद्घाटन श्री. चैतलालजी पटले सरपंच ग्रा. प. बोदलकसा यांच्या हस्ते तसेच ग्राम पंचायत मधील सर्व सदस्यगण आणि गावातील मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे रीतसर उदघाटन करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनातील मनावरील असलेला अभ्यासक्रमाचा मानसिक ताण तणाव दूर करुन विरंगुळा मिळावा व त्यांच्यातील अंगीकृत सुप्त कलागुणांना वाव देता यावा या उद्देशाने दरवर्षी आनंद मेळाव्याचे आयोजन केले जाते.
आजच्या कार्यक्रमांची उल्लेखनीय बाब म्हणजे शाळेत
होत असलेल्या नावीन्यपूर्ण उपक्रमामुळे
ग्रा. प. सदस्यांनी वैयक्तिक रित्या तथा गावातील लोकांनी शाळेला 26000/-रुपयाची मदत केली.
या प्रसंगी शाळेचे मुख्या.श्री.तिश्यकुमार भेलावे यांनी सर्वांचे आभार मानले.
कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी मुख्या. श्री. तिश्यकुमार भेलावे,त्यांचे लहान बंधू अक्षय भेलावे,
व्यवस्थापन समिती अध्यक्ष तथा सर्व सदस्य गण यांनी मोलाचे कार्य केले.