आदर्श विद्यालय येथे विर बाल दिवस उत्साहात साजरा

0
43
1

गोंदिया / धनराज भगत

आदर्श विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आमगाव येथे सकाळ व दुपार पाळीत बाबा फतेसिंग व बाबा जोरावर सिंग यांच्या शहीद दिनी वीर बाल दिवस दिनांक २६ डिसेंबर ला मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या प्रसंगी मुख्य वक्ता म्हणून प्रा. उमेश मेंढे यांनी बाबा फतेह सिंग व बाबा जोरावर सिंग यांचे अल्प वयातील साहस व बलिदान यांची कथा उपस्थितांसमोर वर्णन केली. शिखांचे दहावे गुरु गोविंद सिंग यांच्या कुटुंबाची गाथा व देशासाठी केलेले बलिदान सदैव येणाऱ्या पिढी साठी प्रेरणादायी ठरेल असे विषद केले.
सकाळ पाळीत या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री यू एस मेंढे, प्रमुख अतिथी श्री जी एस शेंडे व वक्ते म्हणून कू ए के मानकर होते व संचालन कू एस टी पटले यांनी केले.
दुपार पाळीत कार्यक्रमाचे अध्यक्ष पर्यवेक्षक श्री डी बी मेश्राम ,प्रमुख अतिथी सौ पी पी बिसेन व मुख्य वक्ता म्हणून श्री यू एस मेंढे होते. कार्यक्रमाचे संचालन कू ए आर गुप्ता व आभार प्रदर्शन श्री तुरेकर सर यांनी केले.
या वीर बाल दिवस प्रसंगी शाळेत गुरु गोविंद सिंग यांच्या जीवनावर गीत सादर करण्यात आला. श्री डि एच बागडे, श्री एस डी मेश्राम यांच्या मार्गदर्शनात निबंध व चित्रकला स्पर्धा सुद्धा आयोजित करण्यात आल्या. मोठ्या संख्येत विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला