मौजा मुंडीपार येथे आजपासुन बैलांच्या ऐतिहासिक शंकरपटाचे उद्घाटन संपन्न

0
83

उपजिल्हा प्रतिनिधी/पंकज रहांगडाले

गोरेगांव :- गोरेगांव तालुक्यातील मौजा मुंडीपार येथे मंगळवार दिनांक २६ डिसेंबर २०२३ ते गुरुवार दिनांक २८ डिसेंबर २०२३ ला तिन दिवशीय बैलांची भव्य ऐतिहासिक शंकरपटाचे आयोजन करण्यात आले आहे.
सध्या ठिकठिकानी बैलगाडा शर्यती मोठ्या थाटामाटात भरवल्या जात आहेत. पण ही खुप जुनी वर्षाची परंपरा असलेली विदर्भातील पारंपारिक स्पर्धा म्हणजे शंकरपट. बैल जोडीची शर्यत म्हणजे शंकरपट. या खेळामध्ये काही भागात एका वेळेस एक गाडी किंवा काही भागात दोन बैलगाड्या सहभागी असतात. यामध्ये गाडीवर बसलेला चालक हा गाडी चालवत असतो. अंतीम सीमारेषेजवळ पंच कमेटी बसलेली असते. जि बैलजोडी सर्वात कमी वेळेत १००० फुट अंतर पार पाडेल, त्यांना प्रथम क्रमांक दिला जातो. ही स्पर्धा सेकंदावर चालते.
या शंकरपटाचे उद्घाटनप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा परिषद सदस्य मा.श्री.डॉ.लक्ष्मणजी भगत ,उद्घाटक पं.स.सदस्य व गट नेता भाजपा मा.श्री.रामेश्वरजी माहरवाडे यांच्या हस्ते पार पाडण्यात आले.
त्यावेळी प्रामुख्यानें पो.पा.विलासजी सिंदीमेश्राम,तंमुस अध्यक्ष शंकरजी बिसेन,माजी सरपंच सुमेंद्रजी धमगाये,माजी उपसरपंच तथा वर्तमान ग्रा.पं.सदस्य जावेद(राजाभाई)खान,माजी तंमुस अध्यक्ष गिरीशजी पारधी,माजी तंमुस अध्यक्ष नामदेवजी नेवारे,तसेच सर्व आजी माजी ग्रा.पं.सदस्यगण उपस्थित होते.
या ऐतिहासिक शंकर पटामध्ये जास्तीत जास्त संख्येने सामील व्हाल अशि घोषना व आव्हाहन आयोजक मंडळी यांनी केली आहे.
आयोजक मंडळ :-श्रीराधाकृष्ण शंकरपट समिती मुंडीपार यांनी पट रशिक बंधवांना संपूर्ण नियमाचे पालन करण्याची घोषना केली आहे. व बैलांची शंकरपट शांतरीत्या पार पाडण्यात सहकार्य करण्याची
अपेक्षा व्यक्त केली आहे.

Previous articleआदर्श विद्यालय येथे विर बाल दिवस उत्साहात साजरा
Next articleशालेय जीवनात क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांना अनन्य साधारण महत्व – पंकज रहांगडाले