शालेय जीवनात क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांना अनन्य साधारण महत्व – पंकज रहांगडाले

0
47

 

अटल जिल्हा क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे थाटात समारोप; अभिनेत्री दीपिका, गायक जॉली मुखर्जी व हास्य कलाकार व्हीआयपी यांनी केले मनोरंजन

गोंदिया / धनराज भगत

 जिल्ह्यातून स्वदेशी खेळोत्तेजक मंडळ बरखास्त झाल्यानंतर तब्बल पाच वर्षानंतर जिल्हा परिषदेने विद्यार्थ्यांसाठी यंदा अटल क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन केले होते. यात जि. प.च्या शाळांमधील हजारो विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन आपल्या कला-गुणांचे सादरीकरण केले. विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनात क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांना अनन्य साधारण महत्व आहे. या माध्यमातून या विद्यार्थ्यांना व्यासपीठ मिळाले आहे. या क्रीडा, सांस्कृतिक महोत्सवातून अनेक प्रतिभावंत खेळाडू घडतील. त्यामुळे या महोत्सवाचे आयोजन आता दरवर्षी केले जाईल, अशी ग्वाही जि.. प. अध्यक्ष पंकज रहांगडाले यांनी केले. अटल क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचा पारितोषिक वितरण कार्यक्रम सोमवारी स्थानिक शहीद जान्या तिम्या हायस्कूल येथील आवारात आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी खा. सुनील मेंढे, आ. विजय रहांगडाले, विनोद अग्रवाल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील, माजी पालकमंत्री डॉ. परिणय फुके, राजकुमार बडोले, माजी आमदार राजेंद्र जैन, आ. मनोहर चंद्रिकापुरे, माजी आ. हेमंत पटले, माजी आ. खोमेश्वरभाऊ रहांगडाले, भेरसिंग नागपुरे, संजय पुराम, भाजप जिल्हाध्यक्ष येसुलाल उपराडे, गोरेगाव पंचायत समितीचे सभापती मनोज बोपचे, आमगाव पं. स. सभापती राजेंद्र गौतम, जि. प. सभापती सविता पुराम, पूजा शेठ, जि. प. सदस्य लायकराम भेंडारकर, भाजप जिल्हा महामंत्री वीरेंद्र अंजनकर, माजी नगराध्यक्ष आशिष बारेवार, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नेतराम कटरे, शिक्षणाधिकारी (प्राथ.) डॉ. महेंद्र गजभिये, शिक्षणाधिकारी(माध्य.) कादर शेख व सर्व गटशिक्षणाधिकारी उपस्थित होते.

अटल क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाच्या पुरस्कार वितरण समारोह कार्यक्रमाच्यापूर्वी चिमुकल्यांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले यांनी केले. अटल क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाची पार्श्वभूमी सांगत, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्रथमच अटल क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे यशस्वी आयोजन केल्याचे सांगितले.

अभिनेत्री दीपिका चिखलिया, गायक जॉली मुखर्जी व हास्य कलाकार यांनी केले उपस्थितांचे मनोरंजन- पुरस्कार वितरण सोहळ्याला रामायणात सीतेची भूमिका साकारणाऱ्या दीपिका चिखलिया, बॉलिवूड गायक जॉली मुखर्जी व हास्य कलाकार व्ही आय पी उपस्थित होते. जॉली मुखर्जी यांनी सुंदर आवाजात गीत सादर केले तर व्हीआयपी यांनी खूप छान मिमिक्री करून उपस्थितांचे मनोरंजन केले. तसेच दीपिका, जॉली मुखर्जी व व्ही आय पी यांनी क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमातील विजेत्या चमुंना व विद्यार्थ्यांना पुरस्कार प्रदान केले.
कार्यक्रमाला जिल्ह्यातील विद्यार्थी व नागरीक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Previous articleमौजा मुंडीपार येथे आजपासुन बैलांच्या ऐतिहासिक शंकरपटाचे उद्घाटन संपन्न
Next article“दारू नको, दूध प्या”…. जनजागृती मोहीम