“दारू नको, दूध प्या”…. जनजागृती मोहीम

0
23
1

केशोरी पोलीस स्टेशनच्या _”दारू नको, दूध प्या”_ या जनजागृती मोहीमेला 27 डिसेंबर पासून सुरुवात.

नवीन वर्षाच्या स्वागतादरम्यान तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात दारूचे सेवन करतो. बेधुंद अवस्थेत असल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात भांडणे होतात तसेच वाहनांचे अपघात देखील होतात. त्यामुळे दुखापत व जीवित हानी देखील होण्याची शक्यता असते.

तरुण वर्गाने दारूपासून परावृत्त होण्यासाठी केशोरी पोलीस स्टेशन तर्फे “दारू नको, दूध प्या” या नावाने दि. 27/12/2023 ते दि. 02/01/2024 दरम्यान जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे.

या मोहिमेदरम्यान प्रत्येक गावात जाऊन नागरिकांना दारूच्या दुष्परिणामाबद्दल माहिती सांगण्यात येणार आहे. तसेच केशोरी गावामध्ये विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढून जनजागृती करण्यात येणार आहे.

दारू पिण्याचे दुष्परिणाम

1. शारीरिक व मानसिक आरोग्य खराब होते.

2. आर्थिक नुकसान होते.

3. कौटुंबिक वाद-विवाद, भांडण-तंटे होतात.

4. समाजात मान-सन्मान मिळत नाही.

दूध पिण्याचे फायदे

1. शारीरिक स्वास्थ्य सुधारते.

2. बौद्धिक क्षमता वाढते.

3. मानसिक आरोग्य सुधारते.

4. शरीरावर कोणताही दुष्परिणाम होत नाही.