सायबर क्राईम व ट्रॅफिक नियम संबंधित चर्चेचे आयोजन

0
14
1

गोंदिया / धनराज भगत

ज्या वेगाने आपण डिजिटल जगाकडे वाटचाल करीत आहोत त्याच वेगाने सायबर गुन्ह्याचे प्रमाणही वाढत आहे, तंत्रज्ञानाने प्रगती केली आणि माणसाचे इंटरनेटवरील अवलंबत्वही वाढले आहे आणि एकाच ठिकाणी बसून इंटरनेटच्या माध्यमातून जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचणे माणसाला शक्य झाले आहे.


सोशल नेटवर्किंग साइट्स वापरणाऱ्या लोकसंख्येला सायबर गुन्ह्याच्या धोक्याविषयी माहिती नसते त्यामुळे देशांमध्ये लोकांच्या वैयक्तिक माहितीच्या गैरवापर होण्याची भीती असते कारण लोक त्यांची वैयक्तिक माहिती विविध सोशल नेटवर्किंग साइटवर शेअर करीत असतात व त्यानंतर ह्या माहितीच्या गैरवापर होतो असे व्यक्तव्य कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे श्री युवराज हांडे, पोलीस इन्स्पेक्टर, पोलीस स्टेशन आमगाव यांनी व्यक्त केले.
सदर कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. के. संघी, डॉ. तुलसीदास निंबेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक महेंद्र तिवारी यांनी केले.