जिमलगट्टा येथे तहसीलदार सुनील सौदाणे यांनी सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांचा केला गौरव  

0
49
1

गडचिरोली /अमोल कोलपाकवार

मुख्यमंत्री महिला सक्षमीकरण योजनेच्या अंतर्गत आयोजित महिला मेळाव्यात सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटी कोंडावार यांचा तहसीलदार सुनील सौदाणे यांनी केला गौरव..

मुख्यमंत्री महिला सक्षमीकरण योजनेअंतर्गत जीमेलगट्टा येथे महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या वेळेस शासनाच्या विविध योजनांची माहिती प्रशासनाच्या वतीने महिला भगिनींना देण्यात आले. यावेळेस महिला सक्षमीकरण तसेच शासकीय योजनांच्या जनजागृतीसाठी कार्य करणाऱ्या समाजसेवकांचा अहेरीचे तहसीलदार सुनील सौदाणे यांनी सत्कार केला. आपल्या सामाजिक कार्याने अनेक नागरिकांमध्ये जनजागृती करणारे सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटी कोंडावार यांचा यावेळेस सह तहसीलदार यांनी शाल व श्रीफळ देऊन त्यांचा गौरव केला. त्यांच्या जनजागृतीमुळे अनेक नागरिकांना जगण्याचे बळ मिळाले.ताटीकोडावार यांनी आपले सामाजिक कार्य अविरत सुरू ठेवावे यासाठी तहसीलदार सुनील सौदाणे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.