उत्पन्न बाजार समिती ची स्थापना तात्काळ करण्याबाबद उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना मागणी

0
37
1

सालेकसा / बाजीराव तरोने

२८ डिसेंबर २०२३ रोजी नागपूर येथे पक्ष पदाधिकारी संवाद दौऱ्यावर असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते श्री पार्थ अजित दादा पवार साहेब यांना माननीय उप मुख्यमंत्री श्री अजित दादा पवार यांच्या नावाने प्रेषित सालेकसा तालुका मध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती ची स्थापना तात्काळ करण्यात यावे. तसेच पिपरिया येथे प्राथमिक आरोग्य केंद्र ची स्थापना करण्यात यावे यासाठी निवेदन देण्यात आले. या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष डा. अजय उमाटे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य तथा आमगाव तालुका अध्यक्ष सुरेश हर्षे, सालेकसा शहर अध्यक्ष ब्रजभूषण बैस, आमगाव शहर अध्यक्ष रवी क्षीरसागर, प्रमोद शिवणकर प्रामुख्याने उपस्थित होते