शून्य कचऱ्यातून रोजगार निर्मिती – अर्चना मोरे

0
64

गोंदिया / धनराज भगत

 दि.२३ डिसेंबर २०२३ रोजी जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा ननसरी च्या भव्य पटागनावर सामाजिक दायित्व व रोजगार निर्मिती एक दिवशी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजन इंजि. तारेंद्र रामटेके पंचायत समिती सदस्य यांच्या द्वारे संकल्पित केलेल्या पंचायत समितीच्या १५ व्या वित्त आयोग (पं.स.स्तर) अंतर्गत पार पाडण्यात आले.


प्रशिक्षण कार्यक्रमाला यशदा पुणे इथल्या प्रवीण प्रशिक्षक अर्चना मोरे यांच्या मिशन शून्य कचरा या विषयावर खूप मोलाचे प्रशिक्षण व मार्गदर्शन आमच्या बचत गटाच्या सर्व उद्योजक महिलांना मिळाला. महिलांमध्ये शून्य कचरा ही संकल्पना चांगल्यापणे रुजवण्यात प्रशिक्षण यशस्वी झालं.प्रशिक्षणाच्या माध्यमातून गावामध्ये कचऱ्याला कसा शून्य करता येते ??व त्याच कचऱ्यापासून रोजगार निर्मितीवर भर देऊन स्वतःचा आर्थिक पाया कसा भक्कम करता येते यावर अत्यंत मोलाचं असं मार्गदर्शन यानिमित्ताने ठरला.या प्रशिक्षण मार्गदर्शनाला यशस्वी करण्याकरिता तालुका पदावर तालुका व्यवस्थापक लन्जे सर, प्रभाग समन्वयक आशा बावणकार, महिला कॅडर व स्थानिक ननसरी,मरारटोला,सरकारटोला इथल्या ग्राम संघाच्या पदाधिकाऱ्यांनी ,महिलांनी हीरहिरीने भाग घेऊन कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न केले.
उद्घाटनप्रसंगी मा.रुपाली भक्तवर्ती सरपंच ग्रा.पं. ननसरी.विनोद लांजेवार सरपंच मरारटोला,रिताताई मेंढे सरपंच ग्रामपंचायत महारीटोला रंजीत शेंडे सरपंच ग्रामपंचायत धामणगाव मा.मारोती रहांगडाले ग्रामसेवक ननसरी.डांगे ग्रामसेवक किकरिपार व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleउत्पन्न बाजार समिती ची स्थापना तात्काळ करण्याबाबद उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना मागणी
Next articleआदर्श कनिष्ठ महाविद्यालय कला विभागाची शैक्षणिक सहल संपन्न