⬛ मा. श्री. एन.बी.लवटे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश – १ व अति. सत्र न्यायाधीश, गोंदिया यांचे निर्णय
गोंदिया / धनराज भगत
आज दिनांक २९/१२/२०२३ रोजी सत्र न्यायालय, गोंदिया यांनी खुनांच्या प्रकरणातील आरोपी कमांक १ नामे निखिल ओमप्रकाश खिरेकर, वय २० वर्षे, रा. पुरगाव ता. गोरेगाव जि. गोंदिया यांस भारतीय दंड विधानाचे कलम ३०२ अंतर्गत आजन्म सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली.
सदर प्रकरण असे की, आरोपी निखिल ओमप्रकाश खिरेकर रा पुरगाव याचे गावातिल एका मुली सोबत प्रेमसंबंधा बददल मृतक शुशिल योगराज पारधी वय वर्षे १९ रा. पुरगाव यास माहित होते म्हणून मृतक हा आरोपी निखिल खिरेकर याची गावात बदनामी करेल म्हणून त्याचा राग आरोपणीचा मणात होता व हाच राग त्याने मणात धरुन त्याने जेव्हा मृतक नेहमी प्रमाणे त्याचा शेतात बक-या चारण्या करिता गेला असता सुना मौका पाहून दिनांक २६/०४/२०२१ चे ०४:०० ते ०४:३० वे दरम्यान मृतकाच्या गळयावर, छातीवर, पाठीवर, माणेवर चाकूने वार करुन मृतक शुशिल योगराज पारधी यास जिवाणशी ठार केले होते. तेव्हा त्याचा सोबत त्याला मदत करण्यासाठी आरोपी क २ रोहीत राजेद्र राहूलकर वय वर्षे १९ व आरोपी कं ३ सागर संजय मेश्राम वय वर्षे १९ दोन्ही रा. पुरगाव हे देखिल गुन्हात सहभागी होते. व सदर घटना मृतकाची बहिन सुनिता योगराज पारधी हिने जेव्हा ती शेतावर कपडे वाळविन्या साठी गेली असता पाहली होती म्हणून दिनांक २७/०४/२०२१ रोजी तिने आरोपीविरूध्द पोलीस स्टेशन गोंदिया ग्रामीण, जि. गोंदिया येथे फिर्याद दिली होती. त्या आधारावर आरोपीविरूध्द कलम ३०२.३४ भा.द.वि. अंतर्गत तिन्ही आरोपी विरुध्द गुन्हा नोंदवून तत्कालीन उपविभागीय पोलीस आधिकारी श्री. जगदीश पांडे, पो.स्टे. गोंदिया ग्रामीण, यांनी सविस्तर तपास करून आरोपीविरूध्द न्यायालयात दोषारोप पत्र सादर केले होते.
सदर प्रकरणात आरोपीविरूध्द दोष सिध्द करण्यासाठी सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील व सरकारी अभियोक्ता श्री. महेश एस. चंदवानी व अति. सरकारी अभियोक्ता श्री. कृष्णा डी. पारधी यांनी एकुण १६ साक्षदारांची साक्ष न्यायालयासमोर नोंदवून घेतली.
एकंदरित आरोपीचे वकील व सरकारी वकील श्री. महेश चंदवानी यांचे सविस्तर युक्तीवादा नंतर तसेच कागदोपत्री पुरावा, वैद्यकीय अहवाल या आधारावर मा. श्री. एन. बी. लवटे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१ सत्र न्यायाधीश, गोंदिया जि. गोंदिया यांनी आरोपीविरूध्द सरकारी पक्षाचा प्रावा ग्राहय धरून
१.आरोपीला भादवी चे कलम ३०२ अतंर्गत आजन्म सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली.
२. तसेच आरोपी क २ रोहीत राजेद्र राहूलकर वय वर्षे १९ व आरोपी के ३ सागर संजय मेश्राम वय वर्षे १९ दोन्ही रा. पुरगाव यांना पुराव्या अभावी त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.