विद्यार्थ्यांनों विकसनशील व्हा ! मा.संजयजी पुराम

0
13
1

🌺पूर्ती पब्लिक स्कूल सालेकसा मे स्नेहसंमेलन बक्षिस वितरण आणि समारोप

जिला प्रतिनिधि / मायकल मेश्राम

मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्था रेंगेपार कोहळी द्वारा संचालित पूर्ती पब्लिक स्कूल आणि ज्यू.कॉलेज सालेकसा,खिलेश महाविद्यालय सालेकसा, एस. आर. बी. महिला महाविद्यालय सालेकसा, वीर बिरसा मुंडा आदिवासी आश्रम शाळा सालेकसा, एस.आर. बी कनिष्ठ महाविद्यालय सालेकसा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वार्षिकोत्सव दिनांक २९ डिसेंबर ला बक्षिस वितरण व समारोपीय कार्यक्रम घेण्यात आला.
या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री संजय जी पुराम, माजी आमदार, आमगाव – देवरी विधान सभा क्षेत्र, उद्घाटक मा.गुमानसिंग जी उपराडे, पं. स. सदस्य तथा अध्यक्ष भा. ज.पा.ता. सालेकसा, मा.श्री राजेन्द्र जी बडोले सर ,सचिव मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्था रेंगेपार कोहळी,मा. सौ. अर्चनाताई मडावी, पं. स. सदस्य सालेकसा, मा. सौ.प्रतिभा ताई परिहार जिला उपाध्यक्ष भा. ज. पा. महिला आघाडी गोंदिया, मा.श्री परसरामजी फुंडे, भा. ज. पा. प्रभारी तालुका सालेकसा, मा. श्री विक्की भाटिया, ता.उपाध्यक्ष भाजपा सालेकसा, मा.श्री आदित्यजी शर्मा महामंत्री, भा.ज. यु.मो.जिल्हा गोंदिया, मा. टिकेशजी बोपचे जिल्हा सचिव ,युवा मोर्चा भाजपा गोंदिया, मा.मायकलजी मेश्राम अध्यक्ष युवक राष्ट्रवादी काँग्रेस सालेकसा, मा.श्री ब्रजभूषण जी बैस, शहर अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस सालेकसा, मा.सौ संगीता ताई शहारे, माजी पं.स. सदस्य सालेकसा, मा.श्री मुकेशजी इनवाते ,सामाजिक कार्यकर्ता, मा.श्री बबलुजी श्रीवात्री, सामाजिक कार्यकर्ता, मा.सौ जयश्री बाई साखरे,सामाजिक कार्यकर्ता , मा.श्रीमती मनोरमा बाई बडोले,उपाध्यक्ष मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्था , मा.श्री जगननाथसिंगजी परीहार,सामाजिक कार्यकर्ता, मा.सौ शालिनीताई बडोले,अध्यक्ष मा. ब.स.रे.को. मा.श्री अरविंदजी राऊत पोलिस उपनिरीक्षक सालेकसा, मा.श्री उमेदलालजी जैतवार , माजी सभापती ,बांधकाम समिती न. पं.सालेकसा प्रामुख्याने उपस्थित होते.
सर्वप्रथम प्रतिमेच्या स्वरूपात विराजमान भारतमाता,राष्ट्रपिता म.गांधी, भगवान वीर बिरसा मुंडा,छ्त्रपती शिवाजी महाराज, क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच दीप प्रज्वलीत करून माल्या अर्पण करण्यात आले.
अध्यक्षीय भाषणात मा. संजय जी पुराम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विद्यार्थांनी विकसनशील व्हावे तसेच सोशियल मिडिया पासून मुलांना दूर राहण्याकरिता सांगितले चांगले गुण आत्मसात करत जीवनात यशाची उंची गाठा वी जीवनात यशस्वी होण्याकरिता नेहमी प्रयत्न करावे कधीही निराश होता कामा नये अशा प्रकारे विद्यार्थाचे मार्गदर्शन केले व तसेच पुरस्कार वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. लोकेश चन्ने, बागडे सर आणि आभार प्रा.खुशाल साखरे सर यांनी मानले.