न्यूज प्रभात…
प्रतिनिधी- अभिजीत कोलपाकवार
आष्टी येथील राजे धर्मराव हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाचे आयोजन…
चामोर्शी: तालुक्यातील आष्टी येथे मुख्यमंत्री शासकीययो
जना सुलभीकरण अभियानांतर्गत महिला सशक्तीकरण कार्यक्रमाचे आयोजन तहसील कार्यालयाच्या वतीने केले जात आहे. २९ डिसेंबर रोजी आष्टी येथे सदर कार्यक्रम पार पडला. यात शालेय विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम व विशेषतः महिलांसाठी सुरू असणाऱ्या विविध योजनांची माहिती मिळाल्याने आष्टी परिसरातील महिला अक्षरशः भारावून गेल्या.
राजे धर्मराव हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात पार पडलेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन आष्टी ग्रामपंचायतीच्या सरपंचा बेबीताई बुरांडे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी उत्तम तोडसाम तर प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार प्रशांत घोरुडे, संवर्ग विकास अधिकारी सागर पाटील, सामाजिक कार्यकर्ते संजय पंदिलवार, ठाकरी च्या सरपंचा नंदा कुळसंगे, मार्कडा कंन्सोबा च्या सरपंचा वनश्री चापले, प्राचार्य डी.डी. रॉय, माजी जिल्हा परिषद सदस्य धर्मप्रकाश कुकुडकर, पोलिस उपनिरीक्षक बनवे आदी मंचावर उपस्थित होते.
याप्रसंगी बोलतांना उपविभागीय अधिकारी उत्तम तोडसाम म्हणाले शासनातर्फे महिलांसाठी विविध योजना राबविण्यात येत आहे. त्या योजना महिलांपर्यंत पोहचल्या पाहिजे यासाठी या शिबिराचे आयोजन केले आहे. बचतगट तसेच गृह उद्योग करणाऱ्या महिलांनी शासनाच्या योजनेचा फायदा या शिबिरातुन घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. या शिबिरात विविध विभागाचे स्टॉल लावण्यात आले होते. तत्पूर्वी संकल्प रथाचे स्वागत करण्यात आले. जि.प.उच्च प्राथमिक शाळा व राजे धर्मराव हायस्कूल च्या विद्यार्थीनिनी विविध नृत्य सादर करुन उपस्थित मान्यवरांचे लक्ष वेधून घेतले. सदर शिबिरामध्ये आष्टी मंडळांतर्गत येणाऱ्या गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी तहसील कार्यालयाच्या वतीने नागरीकांना द्यावयाचे विविध दाखले, पंचायत समिती व ग्रा. पं.च्या वतीने तसेच महिला व कार्यालयाच्या वतीने द्यावयाच्या विविध लाभाच्या योजना एकाच छताखाली देण्यात आल्या. यात पंचायत समिती चामोर्शी चे ४५०० दाखले वाटप महसूल विभाग ६४३०, गट अभियान व्यवस्थापक उमेद ३६०, कृषी अधिकारी ६००, सहायक आयुक्त पशू चिकित्सक ४००, तालुका आरोग्य अधिकारी १६००, एकात्मिक बाल विकास प्रकल्प ११०, वीज मंडळ चामोर्शी ३५, गटशिक्षणाधिकारी चामोर्शी २००, भूमी अभिलेख १४०, गडचिरोली कोपरेटीव्ह बँक चामोर्शी २००, स्टेट बँक १०, वनपरिक्षेत्र चामोर्शी ५ वितरण करण्यात आले.https://newsprabhat.in/?p=80886&preview=true