आपला विदर्भगोंदिया

के.के. इंग्रजी प्रायमरी शाळेत वार्षिक क्रीडा संमेलन उत्साहात साजरा

गोंदिया / धनराज भगत
दिनांक २७/१२/२०२३ बुधवार व दिनांक २८/१२/२०२३ गुरुवार ला के.के.इंग्रजी शाळेत संचालक मंडळाचे सदस्य श्री ललित मानकर, शाळेचे प्रमुख डॉक्टर संघी सर व प्राचार्या श्रीमती रीना भुते यांच्या उपस्थितीत वार्षिक क्रीडा संमेलनाचे आयोजन करण्यात आले. दिनांक २८/१२/२०२३ रोज बुधवार ला वार्षिक क्रीडा संमेलनाचे उद्घाटन श्री ललित मानकर व डॉक्टर डि.के. संघी सर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या वेळी सर्व शिक्षक वृंद,विद्यार्थी विद्यार्थिनी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

क्रीडा संमेलनाची सुरुवात खेळाचे प्रतीक असलेले मशाल जाळून करण्यात आले. त्यानंतर श्री ललित मानकर व डॉक्टर डी.के. संघी सर यांनी आपल्या भाषणातून खेळाचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. त्यानंतर दोन्ही दिवशी वेगवेगळ्या खेळांच्या स्पर्धा घेण्यात आल्या त्यात विद्यार्थ्यांनी मनसोक्तपणे भाग घेतला व आपल्या सुप्त गुणांचे प्रदर्शन दाखविले. सरते शेवटी जिंकलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस तसेच इतर विद्यार्थ्यांना प्रोत्साहन पर बक्षीस वाटप करण्यात आले. अशाप्रकारे मोठ्या उत्साहात व आनंदात वार्षिक क्रीडा संमेलन संपन्न करण्यात आले.

error: Content is protected !!