गोंदिया / धनराज भगत
व्यसन मुक्त भारत अभियान अंतर्गत आदर्श विद्यालय / कनिष्ठ महाविद्यालय व पोलिस स्टेशन आमगाव यांच्या संयुक्त विद्यमाने व्यसन मुक्त भारत रैली चे आयोजन करण्यात आले.यावेळी पोलिस निरीक्षक युवराज हांडे यांनी रैलीला हिरवी झंडी दाखवून रैलीला सुरवात केली.
व्यसनापासून अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली तसेच गुटख्याच्या सेवनाने कँसंर सारखे रोग होवुन मृत्यू झाल्याने याचा परिणाम परिवारातील लोकांना सहन करावा लागतो याला आळा घालण्यासाठी तरुणांना जागृती निर्माण व्हावी या उद्देशाने पोलिस विभाग व आदर्श विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने रॅलीचे आयोजन करण्यात आले. रैली नगरच्या प्रमुख मार्गाने संचलन करुन परिसरातील नागरिकाना व्यसन मुक्ती चे घोषणा देत जनजागृती करण्यात आली. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य डि, एम, राऊत, उपप्राचार्य के, एस, डोये, पर्यवेक्षक डि, बी मेश्राम, पोलिस उपनिरीक्षक अक्षय वळसे, पोलिस सुरेंद्र लांजेवार, पोलिस मित्र योगेश रामटेके, शिक्षक, शिक्षिका, तसेच पोलिस कर्मचारी यांनी सहकार्य केले.