1
🏀 सूर्योदय क्रीडा मंडळ व ग्राम पंचायत भजेपार च्या संयुक्त विद्यमाने आंतरराज्यीय महिला , पुरुष कबड्डीचा महासंग्राम ” भजेपार चषक “
🏀 उद्घाटन सोहळा पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी
गोंदिया / धनराज भगत
जिल्ह्यातील भजेपार येथे सूर्योदय क्रीडा मंडल येथील युवकांनी व ग्रामपंचायत तसेच गावकऱ्यांच्या लोकसहभागातून आंतरराज्यीय महिला,पुरुष कबड्डीचा महासंग्राम भजेपार चषक कबड्डी स्पर्धा छ.शिवाजी महाराज स्टेडियम या ठिकाणी भव्य दिव्य रोषणाई च्या विशिष्ट आकर्षकांने स्पर्धचे आयोजन करण्यात आले.
दरवर्षी कब्बडी महासंग्राम सामन्यातून राज्यात नावलौकिक मिळविलेल्या भजेपार चषक स्पर्धा ने यावर्षीही नवीन ओळख निर्माण करण्याचे ध्येय घेत या स्पर्धांचे आयोजन केले आहे.
२९ डिसेंबर ला सायंकाळी आयोजीत कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन खासदार अशोक नेते यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी खासदार अशोक नेते यांनी परिसरातील अनेकब वर्षांपासूनची नागरिक जनतेची, विद्यार्थ्यांची, शेतकऱ्यांची,व्यापाऱ्यांची,जी प्रतीक्षा होती ती म्हणजे बरोंनी एक्सप्रेस ट्रेनचा थांबा सालेकसा येथे मिळाल्याने व स्थानिक विविध प्रलंबित विकास कामे मार्गी लावण्यासाठी महत्त्वाची भुमिका घेतल्याची माहिती देत .त्यांनी केन्द्र व राज्यसरकारच्या कल्याणकारी योजनांचा लाभ जनतेने घेऊन विकासाचे पाहूल पुढे करावे असे बोलून त्यांनी नागरिकांचे अभिनंदन करत नेते यांनी या कबड्डी महासंग्राम भजेपार चषकाचा शुभारंभ फित कापून संपन्न केला.
यावेळी कबड्डी स्पर्धेच्या उद्घानप्रसंगी यावेळी प्रामुख्याने माजी आमदार संजय पुराम ,सरपंच चंद्रकुमार बहेकार,जि.प.सदस्या वंदना काळे,जि.प.सदस्या उषाताई मेंढे, जि.प.सदस्या छायाताई नागपूरे,जि.प.सदस्या छबुताई ऊके,पं स.सदस्या अर्चना मडावी, माजी.जि.प.सदस्या तताताई दोनोडे,प.स.सदस्या रेखाताई फुंडे,सुनिल अग्रवाल, प्रभाकर दोनोडे,डाॅ. अजय उमाटे, यशवंत मानकर,जियालाल पंधरे, भाजपा युवा नेतेे तथा ओबीसी तालूकाअध्यक्ष देवराव चुटे, अरविंद फुंडे, राजूभाऊ दानोडे, संतोष बोहरे,आर.डी. रहांगडाले, परसराम फुंडे, डाॅ. खुशाल शिवणकर,कैलास बहेकार, रामदास हतीमारे,मनोज बोपचे, बंडू कटरे,विकी भाटिया, कमलबापु बहेकार,यशवंत शेंडे तथा सूर्योदय क्रीडा मंडळाचे सदस्यगण, गावकरी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढें नेते यांनी युवक व महिलांनी मैदानी खेळ खेळावे. भविष्यात मैदानी खेळाकडे दुर्लक्ष होतांना दिसते.मैदानी खेळ हा लोप पावत असून आजच्या काळात युवकांमध्ये क्रिकेट हा लोकप्रिय होतांना दिसतो.परंतु इतरही खेळ खेळण्याबरोबरच मैदानी खेळाकडे दुर्लक्ष न करता अशा मैदानी खेळाचे आयोजन इतरही मंडळाने करावे.मैदानी खेळामुळे शरीर सुदृढ व निरोगी राहते.
कबड्डी हा मैदानी खेळ म्हणून युवा वर्गानी व महिलांनी मोठया उत्साहाने आनंदाने खेळ खेळावे. कबड्डी मध्ये रेप्री (पंच) पंचांची भुमिका महत्वाची असते,पंचानी एखादी निर्णय देतांना चुकीचा जरी निर्णय नसेल पण तो निर्णय एखाद्या टीम मान्य नसतो अशा वेळी मोठया प्रमाणात वाद विवाद, भांडण, झगडे होतात.यात पोलिस स्टेशन पर्यत सुद्धा तक्रारी गेलेल्या आहेत म्हणुन याकरिता पंचाचा निर्णय योग्य रीतीने मानूनच कबड्डी हा खेळ खेळावा.या मैदानी खेळामुळे शरीर तंदुरुस्त राहण्याबरोबर मानसिक दुष्टया चांगले राहण्यासाठी खेळ खेळावे.असे प्रतिपादन या कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटन व अध्यक्षीय स्थानवरून नेते यांनी केले.
याप्रसंगी खासदार अशोक नेते यांनी खेळाडूंचे हस्तांदोलन करत नाशिक विरुद्ध शिर्डी साईबाबा कबड्डी चा सामन्याचे खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
स्वागताचे विशेष…
सर्वप्रथम पाहुण्यांचे स्वागत जिल्हा.परिषद.प्रा.शाळा भजेपार या विदयार्थी चमुने लेझीम द्वारे आकर्षणाने साकार करत विविध फलके दाखवुन ओळख पटवून दर रविवारला स्वच्छता अभियान, फटाके मुक्त दिवाळी, झाडे लावा झाडे जगवा, आपले जीवन मूल्य, पाणी वाचवा, बेटी बचाव बेटी पढाव, जल जीवन संवर्धन, श्रमदान, भारत मातेची प्रतिमा, तिरंगा झेंडा, लोकनृत्य अशा विविधतेनी आकर्षणाने विद्यार्थी विद्यार्थिनी चांगल्या प्रकारे नृत्य सादर करून पाहुण्यांचं उत्कृष्ट स्वागत प्रदर्शन केले.
भजेपार गावांनी दिले खेळातून गाव ऐक्य दर्शन
भजेपार हे गाव एकोप्याचा, आदर्शाचा, जिव्हाळ्याचा, लोकसहभागाचा वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांवर चालणारा, खेळण्याबरोबरच एकात्मता,कुठल्याही जाती धर्माचा, पक्षाचा भेदाभेद न करता एकत्र येऊन या कार्यक्रमाचे आयोजन करतात हे विशेष महत्त्वाचे.