आष्टीच्या बाजारक्षेत्रातून चोरट्यांनी दुचाकी केली लंपास ,आष्टी पोलिसांसमोर दुचाकी शोधण्याचे मोठे आव्हान..

0
30
1

न्यूज प्रभात

प्रतिनिधी अभिजीत कोलपाकवार

आष्टी:-चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथील आठवडी बाजारक्षेत्रातून अज्ञात चोरट्यांनी दुचाकी लंपास केल्याची घटना दि २९ डिसेंबर ला दुपारच्या सुमारास घडली

 

बाजारात आलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील तालूका गोंडपिपरी, येनबोथला येथील अक्षय गोंगले या तरुणाची ज्युपीटर झेड एक्स कंपनीची एम. एच ३४ सि जी ४७९० क्रमांकाची नवीकोरी दुचाकी ठेवलेल्या ठिकावरुन चोरी झाली आहे

 

आष्टी येथे दर आठवड्याला शुक्रवारी मोठी बाजारपेठ

 

भरते या बाजारपेठेत चंद्रपूर जिल्ह्यातील व आष्टी परिसरातील नागरिक या बाजारपेठेत मोठ्या संख्येने येत असतात अक्षय गोंगले याचे भाऊ सचिन गोंगले हे आपल्या मित्रासोबत शुक्रवारला दुपारच्या सुमारास आष्टी येथे बाजाराकरीता आले अन बाजार क्षेत्रात रस्त्याच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत नवी कोरी दुचाकी ठेवून दोघेजण बाजार करण्याकरिता बाजारात गेले आपला बाजार आटोपून संध्याकाळी ४:३० वाजताच्या सुमारास आपल्या दुचाकीकडे आले असता ठेवलेल्या ठिकाणी दुचाकी न दिसल्याने दोघानाही धक्का बसला. दुचाकीचा इकडे तिकडे शोध घेतला पण दुचाकीचा शोध काही लागला नाही. आपली दुचाकी चोरट्याने चोरून नेल्याचे लक्ष्यात येताच सायंकाळच्या सुमारास दुचाकी चोरीला गेल्याची तक्रार आष्टी पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. चोरीला गेलेल्या दुचाकीचा शोध आष्टी पोलीस घेत आहेत

 

अक्षय गोंगले या युवकाने फायनान्स करुन दुचाकी घेतली एका महिन्यांतच दुचाकी चोरीला गेल्याने या दुचाकीचे हप्ते कसे भरायचे हा मोठा प्रश्न या युवकापुढे पडला आहे. चोरीला गेलेल्या दुचाकीचा शोध घेऊन दुचाकी चोरट्यास शिक्षा द्यावी अशी मागणी सचिन गोंगले व अक्षय गोंगले या भावंडाने केली आहे..