आपला विदर्भगडचिरोली

नवीन वर्षात ‘दारुचा प्याला खाली ठेवा अन् दुधाचा प्याला हातात घ्या’ …

न्यूज प्रभात…

प्रतिनिधी -अभिजीत कोलपाकवार

आष्टी येथील प.पु. शेषराव महाराज व्यसनमुक्ती संघटनेतर्फे

नवीन वर्षात ‘दारुचा प्याला खाली ठेवा अन् दुधाचा प्याला हातात घ्या’ उपक्रम

 

जास्तीत जास्त संख्येने भक्तगण उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्या-प.पु.शेषराव महाराज व्यसनमुक्ति संघटना अध्यक्ष अंकलु पेरकावार, संतोष तांगडे,सुरेश औतकर,सुधाकर कोहपरे, राजु गांधारे, गुणाकर डोके, अनिल कुंबडे,शंकर बोल्लेवार,सागर निखाडे, नितिन भांडारवार

 

आष्टी/- नवीन वर्षात दारू सोडण्याचा संकल्प करा. दारुचा प्याला खाली ठेवा अन् दुधाचा प्याला हातात घ्या, असा संदेश देत आष्टी येथील प. पू. शेषराव महाराज व्यसनमुक्ती संघटनेतर्फे आष्टी येथे दिनांक १ जानेवारी २०२४ रोजी दुधाचे वाटप केले जाणार आहे.

 

आष्टी येथे नवीन वर्षाच्या शुभमुहूर्तावर ‘दारू सोडा संसार जोडा ‘ हा संकल्प डोळ्यासमोर ठेवून दुध वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला तरी परिसरातील नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन प.पु. शेषराव महाराज व्यसनमुक्ती संघटनेचे अध्यक्ष अंकलू पेरकावार यांनी केले आहे.

 

सर्वत्र नवीन वर्षाचं स्वागत अतिशय धुमधडाक्यात केलं जातंय. रात्री उशीरा अनेकांनी पार्टी करुन नवीन वर्षाचं स्वागत करतात. तसंच रात्री झोपताना अनेकांनी नवीन वर्षाच्या निमित्ताने काहीतरी संकल्पही करीत असतात. इकडे, आष्टीत नवीन वर्षानिमित्त व्यसनाला दूर लोटूया म्हणत व्यसनमुक्ती संघटनेकडून नवीन वर्षात दारु नाही तर दुध प्या म्हणत दुधाचं वाटप केलं जाणार आहे.

 

नवीन वर्षात दारू सोडण्याचा संकल्प करा.

 

दारुचा प्याला खाली ठेवा अन् दुधाचा प्याला हातात घ्या, असा संदेश देत व्यसनमुक्ती संघटनेतर्फे दुधाचे वाटप केले जाणार आहे.

 

प.पु. शेषराव महाराज यांच्या व्यसनमुक्ती संघटनेतर्फे आष्टी शहरातील हनुमान मंदीर येथे दूध वाटप केले जाणार आहे असे प. पु. शेषराव महाराज व्यसनमुक्ती संघटनेचे अध्यक्ष अंकलू पेरकावार, संतोष तांगडे,सुरेश औतकर,सुधाकर कोहपरे राजु गांधारे गुणाकर डोके अनिल कुंबडे शंकर बोल्लेवार सागर निखाडे नितिन भाडारवार यांनी सांगितले.

error: Content is protected !!