जगद्गुरु स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांचा पादुका दर्शन सोहळा 7 जानेवारी रोजी….

0
73

♦️आमगाव नगरीत उसळणार जनसमुदाय. … 

 ♦️भवभूति महाविद्यालयाच्या भव्य प्रांगणात पादुका दर्शन सोहळा

गोंदिया / धनराज भगत
 अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज दक्षिण पीठ नाणीज धाम यांचा पादुका दर्शन सोहळा रविवार दिनांक ७ जानेवारी २०२४ रोजी भवूभुती महाविद्यालय आमगाव येथे आयोजित करण्यात आला आहे .हा सोहळा सकाळी १० वाजता पासून सुरू होणार आहे. या कार्यक्रमास जिल्ह्यातील व जिल्हा बाहेरील व्यक्तींकरिता महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आलेले आहे. या संस्थांना मार्फत अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात यामध्ये सप्टेंबर २०१६ ते डिसेंबर २०२३ या कालावधीत समाजाच्या सेवेसाठी ५१ मरणोत्तर देह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना सुकृत करण्यात आले.
तसेच शैक्षणिक उपक्रमा अंतर्गत मोफत इंग्रजी माध्यमाची शाळा, वैद्यकीय उपक्रमांतर्गत मोफत ॲम्बुलन्स व वेळोवेळी रक्तदान शिबिरे तसेच ब्लड नीड अंतर्गत गरजूंना तात्काळ रक्तपुरवठा, दुष्काळग्रस्त ना मदत, अतिवृष्टी मदत, महिला सक्षमीकरण अंतर्गत मोफत शिलाई मशीन वाटप, आर्थिक दुर्बल घटक पुनर्वसन असे अनेक सामाजिक उपक्रम या संस्थानाच्या वतीने चालविले जातात तसेच संस्थानाच्या वतीने शेतीविषयक उपक्रमा अंतर्गत गरजूं शेतकऱ्यांना मोफत फवारणी पंपाचे सुद्धा वाटप करण्यात येते .या कार्यक्रमांतर्गत ज्या महिलांचं छत्र गमावलेलं आहे अशा महिलांना 50 शिलाई मशीन चे वाटप करण्यात येणार आहे .
कार्यक्रमात जगद्गुरु श्रीच्या पादुकांचे पूजन, सामाजिक उपक्रम, गुरुपूजन, आरती सोहळा, प्रवचन सोहळा ,उपासक दीक्षा ,दर्शन, पुष्पवृष्टी अशा मंगलमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे . मानवाला अध्यात्माची परिभाषा समजली की माणसाच्या जीवनाचा कायापालट होतो. विज्ञान आणि अध्यात्म यांची सांगड घालून आधुनिक युगात कसे जीवन जगायचे हे सांगण्यात येणार आहे.तरी आपणास या सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आव्हान पूर्व विदर्भ पीट प्रमुख भोयर साहेब ,पीठ व्यवस्थापक प्रवीण परब साहेब ,जिल्हा निरीक्षक नवरंग मेश्राम, जिल्हा अध्यक्ष मूलचंद खांडवाये ,जिल्हा सचिव जयपाल खांडवाये , जिल्हाप्रसिद्धी प्रमुख योगराज डोंगरवार, अध्यात्मिक प्रमुख ताराबाई राऊत, महिला प्रमुख वैशाली चतुर, जिल्हा कर्नल प्रकाश कोरे, तालुका अध्यक्ष आमगाव भांडारकर साहेब, हेमंत टेंबरे कृषी समिती सभासद, सामाजिक उपक्रम प्रमुख दीनदयाल तुळशीकर, केशव मेश्राम जिल्हा निमंत्रक, मंजुषा तरोणे जिल्हा निमंत्रक ,आमगाव संत संघ शहर प्रमुख पन्नालाल बहेकार व सर्व जिल्हा कमिटी व तालुका कमिटी पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आव्हान केले आहे.
Previous articleराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या कार्यकर्त्यांनी पक्ष संघटने साठी वेळ द्या – माजी आमदार राजेन्द्र जैन
Next articleबाम्हणी येथे रासेयो शिबिराचे थाटात उद्घघाटन