गोंदिया / धनराज भगत
आमगांव येथील विद्या निकेतन कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने तालुक्यातील बाम्हणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सात दिवसीय (ता.२६ डिसेंबर ते १जानेवारी)राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे मंगळवारी(ता.२६) थाटात उद्घघाटन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थासचिव रघुवीरसिंह सुर्यवंशी होते.शिबीराचे उद्घघाटन सहाय्यक पोलीस निरीक्षक गणपत धायगुडे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बाम्हणीचे सरपंच सुभाष थेर,महाविद्यालयाचे प्राचार्य डी.एस. टेंभुर्णे, सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकुमार बहेकार, उपसरपंच उषाताई राऊत, पोलीस पाटील शिलाताई रहिले, बाम्हणी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक अनिल मेश्राम, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष देवराव धावडे, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष रसिलाताई भेदे, ग्रामपंचायत सदस्य जनार्धन शिंगाडे, राजेश रहिले,भेजलाल पटले,धनेश्वरी आगरे, रासेयो समन्वयक प्रा.जी.बी. तरोणे उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगेबाबा यांच्या छायाचित्रास पुष्पहार अर्पण दिप प्रज्वलनाने करण्यात आली.
याप्रसंगी रघुवीरसिंह सुर्यवंशी यांनी अध्यक्षीयस्थानावरून ,शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रसेवा,समाजसेवा,देशोन्नती व सेवाभावीवृतीचा विकास व्हावा व आजचा युवक संस्कारीत व्हावा या हेतूने प्रत्येक महाविद्यालयातून अशा शिबिरांचे आयोजन करणे काळाची गरज ठरली आहे,असे मत व्यक्त केले.तर गणपत धायगुडे यांनी,अशा शिबिरांतून विद्यार्थ्यांची सेवावृत्ती व नेतृत्वशक्ती या गुणांचा विकास होतो.त्यासाठी शिबिरात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग आवश्यक असल्याचे मत उद्घाटकीय भाषणातून व्यक्त केले.यावेळी सरपंच सुभाष थेर,प्राचार्य डी.एस. टेंभुर्णे, सरपंच चंद्रकुमार बहेकार, मुख्याध्यापक अनिल मेश्राम, जनार्धन शिंगाडे, शिलाताई रहिले यांनी समयोचित मार्गदर्शन केले.शिबिरादरम्यान ग्रामसफाई या विषयावर प्रबोधनकार जितेंद्र आसोले , बाल गुन्हेगारी या विषयावर पोलीस शिपाई महेन्द्र डोये, रासेयो जिल्हा समन्वयक प्रा.गणेश भदाडे यांनी शिबिराची उपयुक्तता या विषयावर व वैद्यकीय अधिकारी डाॅ. शितल नागरीकर यांनी आरोग्य विषयक मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाची प्रस्तावना प्रा.संजय बुराडे यांनी केली.संचालन रासेयो समन्वयक प्रा.जी.बी.तरोणे यांनी केले.आभार प्रा.प्रविण मानापूरे यांनी मानले. कार्यक्रमाला अकरावी व बारावीचे शिबिरार्थी विद्यार्थी,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.