आपला विदर्भगोंदिया

भीमा कोरेगाव शौर्य दिन व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त संगितमय समाज प्रबोधन कार्यक्रम

प्रतिनिधी/ नितेश राऊत

अर्जुनी मोरगांव :- तालुक्यातील निमगांव येथे १ जानेवारी भीमा कोरेगाव शौर्य दिन आणि भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनानिमित्ताने दिनांक ३ जानेवारी २०२४ रोजी संगितमय समाज प्रबोधनात्मक कव्वाली च्या कार्यक्रमाचे आयोजन नवतरुण जयभीम ग्रुप निमगांव च्या वतीने करण्यात आले आहे. आणि एक विशेष आनंदाची बाब अशी आहे कि नवतरुण जय भीम ग्रुप मागील वर्षी पासून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती चा हा कार्यक्रम चांगल्याप्रकारे आनंदाने यशस्वीरीत्या पार पाडत आले असून यावर्षी शुद्धा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे आणि म्हणून त्या कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्षस्थानी मा. राजकुमार बडोले, माजी सामाजिक न्यायमंत्री तथा माजी पालकमंत्री गोंदिया जिल्हा व उद्घाटक मा.दानेशजी साखरे, नगरसेवक अर्जुनी/मोर, सहउद्घाटक मा.लायकरामजी भेंडारकर, गटनेते व जि.प सदस्य गोंदिया, मा. यशवंतजी परशुरामकर, सभापती कृ. उ. बाजार समिती अर्जुनी/मोर, उपाध्यक्ष मा. सुगतजी चंद्रीकापुरे, सामाजिक कार्यकर्ता, दीपप्रज्वलन मा. सौ. सविता कोडापे, सभापती पं. स. अर्जुनी/मोर उपस्थित राहतील तरी या समाज प्रबोधन कार्यक्रमाला सर्व समाजबांधवांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावे ही सर्वांना विनंती.

error: Content is protected !!