नगपुरा (मुर्री) येथे श्री सद्गुरू स्वामी अखंडानंदजी महाराज पावन पुण्यतिथी महोत्सव निमित्त श्रीमद भागवत ज्ञानयज्ञाचे आयोजन

0
145
1

गोंदिया / धनराज भगत

श्री सद्गुरू भजन मंडळ द्वारा आयोजित हनुमान मंदिर, बाजार चौक, नगपुरा (मुर्री) गोंदिया येथे श्री श्री ११०८ सद्गुरू ब्रह्मलीन स्वामी अखंडानंदजी महाराज (चित्रकूट) यांची ५६ वी पावन पुण्यतिथी महोत्सव निमित्त प.पु.संत श्री नारायण पुरीजी महाराज यांच्या ब्रम्हवाणीतुन श्रीमद भागवत ज्ञानयज्ञाचे लाभ घेत श्री राजेंद्र जैन यांनी आशीर्वाद घेतले.

श्रीमद भागवत ज्ञानयज्ञाचे (कथेचे) ग्रहण केल्याने मानवाला मनशांती व आनंद प्राप्त होतो तसेच मनोकामना पूर्ण होतात. मानवी जिवनात बदल होऊन ज्ञान, त्याग आणि भक्तीत वाढ होते व मनातील शंका दूर होतात असे प्रतिपादन माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांनी केले व सर्व जनतेला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

यावेळी सर्वश्री राजेंद्र जैन, केतन तुरकर, करण टेकाम, हेमराज हरिणखेडे, नितीन टेम्भरे, तिलक भांडारकर, पंकज चौधरी, दिलीप डोंगरे, धरम मेश्राम, मुनेंद्र नांदगाये, दाराजी बैरीसाल, देवा टेम्भेकर, हितेंद्र नंदेश्वर, निरंजन गायधने, महादेव सोनवाने, ज्ञानेश्वर चित्रिव, अनिल पडोळे, उषाताई भोयर, इंद्रकलाताई पारधी, रश्मीताई भांडारकर, सुदाम बावनकर, नामदेव इळपाते, तेजराम मेश्राम, श्रीकिसन मेश्राम, बाबू बावनकर, प्रेमा पवार, हरीनंद बावनकर, संतोष मेश्राम सहित मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.

Previous articleसमाज के अंतिम व्यक्ति की सेवा करना ही महात्मा गॉंधी का उपदेश – रामगोपाल
Next articleकेंद्र सरकार के फैसले के खिलाफ वाहन चालकों में रोष