आपला विदर्भभंडारा

ब्रेकिंग:- वरठी येथील सनफ्लॅग अँड आयर्न कंपनीत भीषण स्फोट… 3 गंभीर जखमी तर 8 किरकोळ जखमी

भंडारा जिल्हा प्रतिनिधी/ सतीश पटले

मोहाडी तालुक्यातील वरठी येथे दिनांक 2 जानेवारी रोजी पहाटे 3.15 वा. सनफ्लॅग अँड आयर्न कंपनीतील एस एम एस या विभागातील एलएचएफ युनिट मधील हिटिंग फरनेस मध्ये अचानक स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की, यात कंपनीत कर्तव्यावर असलेले तंत्रज्ञ नामदेव झंझाड, अभियंता सागर गभणे व कंत्राटी कामगार हटवार गंभीर जखमी झाले तर कंपनीतील 8 श्रमिक किरकोळ जखमी झाले. यावेळी जखमींचा उपचार नागपूर येथील एका खाजगी रुग्णालयात सुरू असून जखमींची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र कंपनीत स्फोट कोणत्या कारणाने घडली याचे कारण अजूनही अस्पष्ट असून या अपघातात कंपनीतील साहित्यांचेही मोठे नुकसान झाले आहे.

error: Content is protected !!