गोंदिया जिल्ह्यात पेट्रोलचा तुटवडा अनेक पेट्रोल पंप बंद तर काही पेट्रोल पंपावर वाहनाच्या रांगा…

0
109
1

⬛ केंद्र सरकारने हिट अँड रन एक्ट पारित करताच वाहन चालकांचा या कायदाला विरोध

⬛ ट्रक चालकांच्या संपाचा  जिल्ह्याला फटका…

⬛ पेट्रोलसाठी नागरिकांची तौबा गर्दी…

गोंदिया / धनराज भगत

केंद्र सरकारने हिट अँड रन एक्ट पारित करताच वाहन चालकांनी या कायदाला विरोध करण्यासाठी काल राज्य भर आंदोलन केले. तर काही ठिकाणी जाळ फोड देखील झाल्याने पेट्रोल टॅंकर जिल्ह्यात वेळेत पोहोचू शकत नसल्याने दोन दिवस पेट्रोल मिळणार नाही अशी अफवा गोंदिया शहरात पसरताच वाहन चालकांनी रात्री पासूनच पेट्रोल पंपावर गर्दी केली होती.

याचा फटका गोंदिया  जिल्हायातील  सालेकसा, आमगांव, गोरेगांव, तिरोडा, देवरी, सड़क अर्जुनी, अर्जुनी मोर.सह गोंदिया तालुक्याना देखील बसला असुन आज सकाळ पासून देखील पेट्रोल पंपावर वाहन चालकांची गर्दी पाहायला मिळाली आहे. तर जिल्ह्यात १० च्या वर पेट्रोल पंपावर पेट्रोल साठा उपलब्ध नसल्याने बंद ठेवण्यात आले आहे.