सावित्रीबाई फुले जयंती साजरी

0
60

गोंदिया / धनराज भगत

देशभरात 3 जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात येते. सावित्रीबाई फुले यांनी महिला व मुलींना प्रेरणा दिली, त्या देशातील पहिल्या महिला शिक्षिका होत्या आणि महिला सशक्तीकरणाकरिता त्यांनी आपलं संपूर्ण जीवन समर्पित केलं असं या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आज भवभूती शिक्षण संस्था द्वारा संचालित श्री लक्ष्मणराव मानकर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी येथे करण्यात आली.
सदर कार्यक्रमाप्रसंगी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला मालार्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख प्राध्यापक डॉ. तुलसीदास निंबेकर, श्री महेंद्र तिवारी, श्री परमेश्वर वानखेडे, श्री योगेश तीरगम, दीक्षा खोब्रागडे, अपर्णा शुक्ला, चेतन बोरकर आणि देवेंद्र बोरकर प्रामुख्याने उपस्थित होते.