गडचिरोली
गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासुन पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या वाकडी येथे वाघाच्या हल्ल्यात महीला ठार झाल्याची घटना दिनांक तीन जानेवारी रोजी दुपारी साडे बारा वाजताच्या सुमारास घडली.
मंगला बोळे वय 50 वर्ष रा. वाकडी ता.जी.गडचिरोली असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे.
मंगला बोळे ही महीला शेतावर गेली असता ती शेताला लागून असलेल्या जंगल परीसरात सरपण गोळा करीत असताना झुडुपात दबा धरून बसलेल्या वाघाने तिच्यावर हल्ला केला ठार तिला फरफटत नेले व ठार केले. घटनेची माहिती कळताच वनविभागाचे पथक व पोलिस घटनास्थळी दाखल झाले व मृत महीलेला शववि्छेदनासाठी गडचिरोली येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले आहे.गडचिरोली तालुक्यात वाघांच्या मनुष्यावरील हल्ल्यात मोठया प्रमाणात वाढ झाली असून नागरीक दहशतीत जिवन जगत आहे. मनुष्य आणि वाघांच्या संघर्षावर कोणत्याही उपाययोजना करण्यात न आल्याने येणाऱ्या काळात गडचिरोली जिल्ह्यात वाघांच्या हल्ल्यात मनुष्यहानी मोठया प्रमाणात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.