आपला विदर्भगोंदियाताज्या घडामोडी

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा आदर्श घ्यावा – डॉ. सुवर्णा हुबेकर

 गोंदिया / धनराज भगत

महिलांसाठी शिक्षणाचे द्वार खुले करणाऱ्या आद्य शिक्षिका व समाजसेविका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा आदर्श प्रत्येक युवतींनी आपल्या जीवनात घेतला पाहिजे, असे प्रतिपादन केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वैद्यकीय चिकित्सा अधिकारी डॉ. सुवर्णा हुबेकर यांनी केले.

        केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय, गोंदिया येथील महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी विभागामध्ये आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त भव्य नि:शुल्क महिला रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी त्या मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होत्या.

       क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्रला पुष्पहार अर्पण करून या शिबिराचे उद्घाटन जीवनदायी योजनेच्या जिल्हा संयोजिका डॉ. जयंती पटले यांच्या हस्ते करण्यात आले.

        डॉ. जयंती पटले यांनी सांगितले की, आता महिलांचा कॅन्सरचा उपचार पण या जीवनदायी योजनेच्या माध्यमातून  मोफत केला जात आहे. त्यामुळे कोणत्याही महिलांनी आपली बिमारी लपून ठेऊ नये, खास करून चाळीशीच्या महिलांनी आपली कॅन्सर स्क्रिनिंग नियमित करून घ्यावी.

        यावेळी आरोग्य विभागातील सर्व महिला पॅरामेडीकल स्टाफने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. सदर शिबिराच्या यशस्वी आयोजनाकरीता एम.पी.जे.वाय. डेस्कच्या सर्व स्टाफने सहकार्य केले.

error: Content is protected !!