ग्रामीण लोककला जिवंत ठेवण्याचे कार्य केवळ लोककलावंताचे – प्रमोद चिमुरकर

0
58

ब्रम्हपुरी/न्यूजप्रभात वृत्तसेवा

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीच्या निमित्ताने तुलानमाल (ता. ब्रम्हपुरी) येथे श्री गुरुदेव भजन मंडळ तुलानमालच्या वतीने ग्रामीण लोककलावंताचा भव्य मेळावा ३ जाने. ते ५ जाने. या कालावधित आयोजित केलेला असून उद्घाटनाच्या प्रसंगी उद्घाटक म्हणून प्राध्यापक राजेश कांबळे, सहउद्घाटक प्रमोद चिमूरकर, अध्यक्ष खेमराज तिडके, सोनू नाकतोडे, उमेश धोटे, थाणेश्वर कायरकर, मंगला लोणबले, पूनमताई कसारे, राजकुमार कुत्तरमारे, रामप्रसाद मडावी, संजय हनवते, खोब्रागडे साहेब, रोशनसिंग दुधानी व इतर मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.

ग्रामीण लोककला जिवंत ठेवण्याचे काम केवळ ग्रामीण लोककलावंत करीत असून लोककलांमुळे प्रबोधनाचे कार्य होत आहे. असे प्रतिपादन प्रमोद चिमूरकर यांनी याप्रसंगी व्यक्त केले. सर्व ग्रामीण परिसरातून आलेल्या लोककलावंतांनी गावातून रॅली काढून वाघ, तंट्या, लेझीम पथक, भजन, दिंडी, वासुदेव, खडी दंडार, तमाशा यासारख्या लोककलाप्रकाराने संपूर्ण गावातील लोकांना मनोरंजीत केले. याप्रसंगी गावातील हजारो नागरिक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्र संचालन चंद्रशेखर चौधरी सर यांनी तर मेळावा यशस्वी होण्यासाठी श्री गुरुदेव सेवा भजन मंडळ व जिजाऊ महिला ग्राम संघाच्या महिलांनी तसेच मोरेश्वर चहांदे, प्रमोद तुपट, डाकरेश्वर बगळे, जिजाबाई बगळे, कालींदाबाई कसारे, संध्याताई नाकतोडे, कुणाल ठाकरे, विकास नाकतोडे व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. तीन दिवसीय मेळाव्यात दंडार, भजन, कीर्तन, लोककला, खडी गंमत, तमाशा इ. लोककलाप्रकार सादर होणार आहेत.