न्यूजप्रभात वृत्तसेवा
दि.03/01/2024 रोजी ग्राम पंचायत दवनिवाडा येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका तसेच थोर समाज- सेविका यांची जयंती साजरी करण्यात आली .
या कार्यक्रमात उमेद अभियानातील तीन्ही ग्रामसंघातील (राणी लक्ष्मीबाई ग्रामसंघ, अन्नपुर्ण ग्रामसंघ व मैत्री ग्राम संघ) पदाधिकारी, सर्व गटाचे सदस्य, ICRP तसेच कृषीसखी यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रम पार पाडण्यात आले .
कार्यक्रमात विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम गीत, भाषण, नृत्य घेण्यात आले व महिलांचे मनोबल वाढवण्यात आले.याप्रसंगी सर्व पदाधिकारी, सदस्य व बहुसंख्येने महिला उपस्थित होत्या.