विद्युत करंट लागल्याने दोघांचा मृत्यू झाल्याची घटना गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील कटंगी येथे आज सकाळी घडली आहे. घनश्याम वलथरे आणि संपत वलथरे असे दोन्ही मृतकांचे नाव आहे.
गोरेगाव तालुक्यातील कटंगी येथील गावाच्या बाहेर असलेल्या विद्युत डीपीवर काही तांत्रिक अडचण आल्याने ते दुरुस्त करायला गेले असता विद्युत करंट लागल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलेली आहे.