गोंदिया / धनराज भगत
भाजप महिला आघाडी व बेटी बचाओ बेटी पढाओ आघाडी आमगाव च्यावतीने दि. ३/१/२०२४ रोज बुधवारला ठिक दुपारी 3.00 वा.महाकाली मंदिर परिसरात क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरा करण्यात आली व बेटी बचाओ बेटी पढाओ अंतर्गत रांगोळी स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या विजेतांना बक्षीस वितरण करण्यात आले तसेच आपल्या देवरी _आमगाव विधानसभा क्षेत्र मिळुन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी माजी नगराध्यक्ष नगरपालिका गडचिरोली, भाजप जिल्हा महामंत्री तथा गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे संयोजिका आदरणीय सौ.योगिताताई प्रमोदजी पिपरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम घेण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिला बालकल्याण सभापती सविता ताई पुराम तर प्रमुख अतिथी म्हणून अर्चनाताई मडावी, महिला आघाडी अध्यक्ष सुषमा ताई भुजाडे, पस सदस्य सुनंदा उके, प्रतिभा चौधरी, कविता उरकुडे, पुष्पाताई करकाडे ,संगीता वाटकर, सुनिता अग्रवाल उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व भाजप महिला पदाधिकारी व कार्यकर्ती यांनी सहकार्य केले.

