आपला विदर्भगोंदिया

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

गोंदिया / धनराज भगत

गोंदिया येथील जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयात (दि.०३ जानेवारी) क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिविक्षा अधिकारी श्रीमती सुजाता देशमुख तर प्रमुख अतिथी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी तुषार पौनिकर तसेच कार्यालयातील सर्व कर्मचारीवृंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रारंभी चाईल्ड लाईनचे कर्मचारी श्री राजेश खोब्रागडे व सौ. अश्विनी मेश्राम यांनी क्रांतीगीत सादर केले. प्रास्ताविक संरक्षण अधिकारी (क) श्रीमती रेखा बघेले यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे पुनेश नाकाडे यांनी तर आभारप्रदर्शन परिविक्षा अधिकारी अनिल बांबोळे यांनी मानले.  कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयातील कर्मचारी, जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे कर्मचारी व चाईल्ड लाईन च्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

error: Content is protected !!