आपला विदर्भगुन्हेवृत्तगोंदियाताज्या घडामोडी

अवैधरित्या मुरुम वाहतूक करीत असताना 05 गाड्या तहसील कार्यालयात जमा

सालेकसा/बाजीराव तरोने

सालेकसा येथे रेल्वे तिसऱ्या लाईन चे काम सुरू असले तरी या कामाला पीव्हीआर ( PVR) कंपनी करत आहे. या कामावर मुरूम माती लागत असली तरी अवैधरित्या मुरुम वाहतूक केली जाते यासंदर्भात काल 05 जानेवारी 2024 रोजी तालुका दंडाधिकारी तहसीलदार यांना माहिती कळताच योग्य ती चौकशी करत असताना रात्री 10.30 वाजेच्या दरम्यान अवैधरित्या मुरुम वाहतूक करीत असताना स्वतः तहसीलदार नरसय्या गोंडागुरले तलाठी डोये ,आढव तसेच झरारिया व बावने यांच्या उपस्थितीत मुरूमने भरलेले चार हायवा व एक रिकामी हायवा असे पाच हायवा गाडी तहसील कार्यालयात लावण्यात आले. सदरची कारवाई तहसीलदार तहसील कार्यालय सालेकसा करीत आहेत.

error: Content is protected !!