दुहिता उदयाचे स्वागत करा – भावना कदम

0
23
1

गोंदिया / धनराज भगत

 बाई गंगाबाई महिला व बाल रुग्णालयात 3 जानेवारी रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने “माझी कन्या भाग्यश्री “जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
सर्वप्रथम माजी सभापती सौ भावना ताई कदम यांच्या शुभ हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून आदरांजली अर्पित करण्यात आली.

या वेळी प्रमुख मार्गदर्शिका म्हणून वैद्यकीय अधिकारी डॉ सुवर्णा हुबेकर मेट्रोन अर्चना वासनिक बबली चौधरी पूजा जैस्वाल लक्ष्मी कानोजिया रंजिता कांनोजिया वंदना तुरकर आशा सोनी तसेच नर्सिंग स्टाफ रुपाली गेडाम ममता कानफाडे रामटेके, प्रियांका डोंगरे प्रयोगशाळा,तंत्रद्य रीना भांडारकर श्रीमती किरणापुरे नितु फुले सारिका तोमर तृप्ती बाजपाई आदी प्रामुख्याने उपस्थित होत्या.
या वेळी प्रमुख अतिथी माजी सभापती भावना ताई कदम यांनी आवाहन केले की क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा आदर्श घेऊन आपण मुलीच्या (दुहिता)जन्माचे स्वागत केले पाहिजे. आता तर आपल्या महाराष्ट्र राज्यात माझी कन्या भाग्यश्री या योजनेत मुलगी जन्माला येताच लखपती होत आहे .त्यामुळे मुलीची जन्मा नंतर ची हेळसांड आता बंद झाली पाहिजे मुलींना जास्तीत जास्त शिकून आत्मनिर्भर करा व क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचा आदर्श घ्या असे आवाहन भावना ताई कदम यांनी या प्रसंगी उपस्थित महिलांना केले.
या वेळी डॉ सुवर्णा हुबेकर यांनी माझी कन्या भाग्यश्री या योजनेबद्दल सविस्तर माहिती दिली तसेच गर्भवती महिलांनी प्रधान मंत्री मातृत्व वंदन योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले .नियमित आरोग्य तपासणी करून सुरक्षित मातृत्व चा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ हुबेकर यांनी केले.
या वेळी मेट्रोन अर्चना वासनिक यांनी बाई गंगाबाई महिला रुग्णालयात उपलब्ध असणाऱ्या माता बाल संगोपन सुविधा चा लाभ घ्यावा असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे संयोजन रुपाली गेडाम यांनी केले तर आभार प्रदर्शन सारिका तोमर यांनी केले.