तिरोडा / पोमेश रहांगडाले
शेतक-यांना खसरा नोंद करण्याकरिता मागील ३ वर्षापासून महसूल विभाग महाराष्ट्र शासनाने इ पिक मोबाईल अॅप कार्यान्वित केले असून शेतक-यांना आपल्या बांधावर जावून पिकाची फोटो काढून खसरा नोंद करण्याचे आदेश दिले आहेत. बहुतांश शेतकरी वर्गाजवळ अद्याप ऍद्राई मोबाईल उपलब्ध नसल्याने इतर व्यक्तीची मदत घ्यावी लागते व बहुतांश गावी नेटवर्कची अडचण असल्याने खसरा नोंन्दीमध्ये चुका आढळून येतात, ई पिक पाहणी अॅपमध्ये खसरा नोंद करण्याकरिता मर्यादित कालावधी असून एकदा जमा करण्यात आलेली माहिती कालावधी गेल्यावर दुरुस्त करता येत नाही तसेच ज्या शेतक-यांनी ई पिक अॅपमध्ये खसरा नोंद केले आहे त्यांनाच शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर धान विक्री करता येतात तांत्रिक अडचनीमुळे ज्या शेतक-यांचे खसरा नोंद झाले नाही असे शेतकरी शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर धान विक्रीपासून वंचित राहत असतात सदर खसरा नोंद दुरुस्त करण्याची सुविधा तलाठी यांच्या लॉगीनमध्ये दिल्यास शेतक-यांना उद्भभवना-या समस्या दूर करता येतील तेव्हा सदर खसरा दुरुस्त करण्याची सुविधा तलाठी यांच्या लॉगीनमध्ये देण्यात यावी, खरीप व रबी हंगामात नियमित पीकपेरा भरण्याची सुविधा तलाठी लॉगीनमध्ये देण्यात यावी,शासकीय आधारभूत धान खरेदीची नोंदणी सुरु असेपर्यंत लिंक सुरु ठेवण्यात यावी जेणेकरून शेतक-यांना शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर धान विक्री करणे सोयीचे ठरेल असे आशयाचे पत्र जिल्हाधिकारी महोदयांना दिले आहे यावर जिल्हाधीकारी महोदयांनी तातडीने जमावबंदी आयुक्त यांना पत्र पाठवून सदर समस्या मार्गी लावण्याबाबत कळविले आहे.

