आपला विदर्भगोंदिया

जिल्हा माहिती कार्यालयात पत्रकार दिन साजरा

गोंदिया / धनराज भगत

जिल्हा माहिती कार्यालयात आज दि.०६ जानेवारी २०२४ रोजी “पत्रकार दिन” साजरा करण्यात आला. आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस  ज्येष्ठ पत्रकार रवी आर्य यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते, वरिष्ठ लिपिक धम्मदीप बोरकर, बंडूसिंग राठोड व शिपाई संतोष राऊत उपस्थित होते. उपस्थितांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण केले व अभिवादन केले. यावेळी पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

error: Content is protected !!