वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- गजानन पोटदुखे
दिनांक 02 जानेवारी हा दिवस महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन /रेजींग डे म्हणून साजरा करण्यात येत असतो. त्या निमीत्याने वर्धा जिल्हा पोलीस दलातर्फे दिनांक 02 ते 08 जानेवारी, 2024 दरम्यान पोलीस अधीक्षक, कार्यालय तसेच प्रत्येक पोलीस स्टेशन अंतर्गत निरनिराळे कार्यक्रम घेवून महीला, वरीष्ठ नागरीक, लहान मुले, सर्वसामान्य नागरीकांमध्ये सुरक्षीततचे वातावरण तयार व्हावे यासाठी वृध्दाश्रम, शाळा व कॉलेजमधील विद्यार्थी, महीला यांच्यामध्ये जावून सलोखा निर्माण करण्याचे काम करण्यात येत आहे तसेच पोलीस विभागाच्या वेगवेगळ्या विभागाबद्दल माहिती देवून जनजागृती करण्यात येत आहे.त्या निमीत्याने मा पोलीस अधीक्षक यांचे संकल्पनेतुन दिनांक 04.01.2024 व दिनांक 05.01.2024 रोजी पोलीस मुख्यालय, वर्धा येथे पोलीस विभागातील सर्वच शाखाचे कामकाज व जनतेस त्याचा उपयोग याकरीता वर्धा जिल्हा पोलीस प्रदर्शनी लावण्यात आली होती. त्यामध्ये सायबर सुरक्षा, वाहतूक विभाग, शस्त्रे व दारूगोळा, पोलीस वाहने, डॉग स्कॉड, जलद प्रतिसाद पथक, दंगल नियंत्रण पथक अंमली पदार्थ जागृती, दामीनी पथक / पोलीस काका व पोलीस दीदी, होम गार्ड, फॉरेन्सीक व्हॅन टूल किट, बॅन्ड पथक, दंगल नित्रयण साधने यांचे एकूण 16 स्टॉल लावण्यात आले होते सदर प्रदर्शनी करीता वर्धा जिल्ह्यातील शाळांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला असुन 6700 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी व नागरीकांनी सहभाग घेतला आहे.
तसेच वर्धा जिल्ह्यातील UPSC व MPSC व इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करीत असलेल्या विद्यार्थी करीता दिनांक 05.01.20224 रोजी दुपारी 03.30 वा. मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले. सदर मार्गदर्शन शिबीराचा लाभ घेणे करीता 250 विद्यार्थी उपस्थीत झाले असुन त्यांना प्रमुख मार्गदर्शक म्हणून मा. श्री. नूरूल हत्तन (भा.पो.से.) पोलीस अधीक्षक, वर्धा, मा. श्री. राहुल चव्हाण (भा.पो. से.) उपविभागीय पोलीस अधिकारी, पुलगाव, मा. डॉ. सागर कवडे (म.पो.से) अपर पोलीस अधीक्षक, वर्धा यांनी मोलाचे मार्गदर्शन केले तसेच त्यांचे उज्वल भविष्याकरीता शुभेच्छा देण्यात आल्या.