वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- गजानन पोटदुखे
दिनांक :- 07 जानेवारी 2024
देवळी शहरात शालेय जीवनातच स्वावलंबन, साहस, देशप्रेम व नैतिक मुल्य रुजविण्याची नितांत गरज असून या दृष्टिकोनातून स्काऊट गाईड ही आदर्श नागरिक घडविणारी चळवळ आहे, असे प्रतिपादन 37 व्या स्काऊट गाईड जिल्हा मेळाव्याच्या उदघाटन प्रसंगी स्थानिक एस.एस.एन.जे.महाविद्यालयाच्या प्रांगणात खासदार रामदास तडस यांनी 5 जानेवारी रोजी केले.
उदघाटन सोहळा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार रामदास तडस, उदघाटक म्हणून डायटचे प्राचार्य डॉ. मंगेश घोगरे तर प्रमुख अतिथी म्हणून यशवंत ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष समीर देशमुख, उपाध्यक्ष सतिश राऊत, नयारा एनर्जी चे प्रबंधक संजय अग्रवाल, विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते, नाट्यदिग्दर्शक हरिष इथापे, उपशिक्षणाधिकारी उषा तळवेकर, नयाराचे सेफ्टी प्रबंधक राधाकृष्ण, स्वाती कोल्हटकर, स्काऊटचे जिल्हा संघटक नितेश झाडे, वैशाली अवथळे व रोव्हर स्काऊटचे
जिल्हा आयुक्त कॅप्टन मोहन गुजरकर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात तंबू निरीक्षणाने झाली. या प्रसंगी हरिश इथापे म्हणाले स्काऊट गाईड व्यक्तीमत्व विकास घडविणारी चळवळ आहे तर युवा नेते समीर देशमुख म्हणाले देशाकरीता समर्पित नागरिकांची फळी निर्माण करणारी एकमेव संस्था म्हणजे स्काऊट व गाईड चळवळ होय.
उदघाटक डाॅ. मंगेश घोगरे म्हणाले स्काऊट गाईड ही उत्तम नागरिक घडविणारी चळवळ आहे तर संजय अग्रवाल म्हणाले युवावर्गात जोश निर्माण करून त्यांना देशसेवेकरीता सुसज्ज निर्माण करणारा स्काऊट गाईड चा अभ्यासक्रम प्रशंसनीय आहे.
या प्रसंगी हिमालय वूड बॅच चे प्रशिक्षण पुर्ण करणारे दिपक गुढेकर, याकुब शेख, राजहंस जंगले व अभिजित पारगावकर यांना प्राविण्य प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
संचालन रोव्हर लिडर प्रा. रविंद्र गुजरकर व संतोष तुरक तर आभार जिल्हा संघटक नितेश झाडे यांनी केले. यशस्वीतेकरीता उर्मिला चौधरी, निर्मला नंदुरकर, रूपा कडू, संगीता पेढे, सुरेन्द्र उमाटे, दत्तात्रय भिषणूरकर, वैशाली गुजरकर, आसीफ शेख, योगेश आदमने, संकेत हिवंज, स्वप्नील सावदे, विपीन मगरे, विशाल जाचक व राजेश महाजन व रोव्हर्स-रेंजर्स नी सहकार्य केले.