गोंदिया / धनराज भगत
रामदेवरा मंदिर सभागृह, रेलटोली गोंदिया येथे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग गोंदिया व जेष्ठनागरीक सेवा संघ व्दारा स्नेहमिलन व सांस्कृतिक कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन व उदघाटन माजी आमदार श्री राजेंद्र जैन, जिल्हाधिकारी श्री चिन्मय गोतमारे, सहाय्यक उपायुक्त श्री विनोद मोहतुरे, माजी आमदार श्री रमेशभाऊ कुथे, सेवानिवृत्त उपायुक्त श्री अनिल देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. गोंदिया शहरातील जेष्ठ नागरिकांसाठी प्रथमच सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
याप्रसंगी सर्वश्री अनिल देशमुख, नारायणप्रसाद जमईवार, लखनसिह कटरे, दुलीचंद बुद्धे, लिलाधर पाथोडे, माधुरी नासरे, अनुप शुक्ला, संजय रहांगडाले, सुरेश वाघाये, शशिकांत कन्हाई, रमेश चामट, मुन्नालाल यादव, शरद क्षत्रिय, सुनिल भजे सहित जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.