रोंडा येथे वार्षिक स्नेहसंमेलनाची खेड़ स्पर्धे ने जोमात शुरुवात

0
87

मायकल मेश्राम

गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुका अंतर्गत रोंडा येथे अभिनव विद्या मंदिर कॉन्व्हेंट या शाळेत तीन दिवसीय स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले .व आंतर शालेय खेळ स्पर्धा घेवून वार्षिक महोत्सवाची मोठ्या उत्साहात शुरुवात करण्यात आली. या स्नेहसंमेलना च्या अध्यक्ष स्थानी सैलेश माहुले मुख्याध्यापक , तर उद्घाटक म्हणून गटशिक्षणाधिकारी विशाल डोंगरे होते. प्रमुख अतिथी म्हणून भाजप तालुका उपाध्यक्ष विकी भाटिया विशेष पाहुणे म्हणून तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष यशवंतराव शेंडे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष ब्रजभूषण बैस, तालुका अध्यक्ष युवक राष्ट्रवादी कांग्रेस मायकल मेश्राम, विजय. नागपुरे शिवसेना. ता अध्यक्ष (शिंदे गुट), एम.पी.माहुले यांच्यासह इतर पाहुण्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कार्यक्रमाची सुरुवात भारत माता बजरंग बली व शारदा मातेच्या फोटोचे तसेच सावित्रीबाई फुले यांच्या फोटोचे पूजन करून कार्यक्रमाचे सुरुवात करण्यात आली व उपस्थित पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. सालेकसा तालुक्यातिल ग्रामीण भागात जिल्हा परिषद शाडे बरोबर विधार्थ मध्ये सुद्धा खेळाचे महत्व अधिक आहेत असे उद्घाटक विशाल डोंगरे यांनी सांगितले व शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांमध्ये कलागुणांच् वाव असणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन पत्रकार संघटनेचे अध्यक्ष यशवंतराव शेंडे यांनी सांगितले तर उपस्थित सर्व पाहुणे मंडळींनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देव खंडवाए सर यांनी केले व प्रास्ताविक संस्थेचे सचिव मनोज अग्रवाल यांनी केले आभार प्रदर्शन माया आबेडारे यांनी मानले कार्यक्रमाच्या पूर्वतयारी करिता गोल्डी भाटिया विजय बसेना बाबू गुरु खुशभू भाटिया राजू फाये मधु डोये गीरीश पटले आशीस वाघमारे रंजू शहारे देवेंद्र बागडे. व शाळेचे शिक्षक शिक्षिका शाळा व्यवस्थापन समिती पालक यांच्यासह विद्यार्थी यांनी सुद्धा मोलाची कामगिरी बजावली आहे विद्या मंदिर कॉन्वेंट ची सुरुवात दहा वर्षांपूर्वी एका छोट्याशा झोपडीतून झाली होती आणि विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे मिळावी म्हणून पालक वर्गणी व शिक्षकांनी फार मोठी मेहनत घेत आज जवळपास पाच ते दहाव्या वर्गापर्यंत या कमेंटमध्ये विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षणाचे धडे घेत आहेत. येणाऱ्या काळात विद्यामंदिर कॉन्वेंट शाळा ही सुजलाम सुफलाम होईल असेही मुख्याध्यापक यांनी सांगितले या तीन दिवसीय खो कबड्डी स्पर्धेमध्ये विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या उत्सुकतेने कबड्डी खो खो आनी इतर स्पर्धेत भाग घेतला.

Previous articleझिझिफस वनस्पती लुप्त होणा-या मार्गांवर – डॉ. कैलास व्हि. निखाडे, निसर्ग अभ्यासक
Next articleउपविभागीय अधिकारी आदित्य जिवणे (भा.प्र.से.) यांचे स्वागत