आपला विदर्भगडचिरोली

उपविभागीय अधिकारी आदित्य जिवणे (भा.प्र.से.) यांचे स्वागत

एटापल्ली,

तालुक्याचे नवनियुक्त उपविभागीय अधिकारी तथा भामरागड प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी आदित्य जिवने (भा.प्र.से.) यांचे एटापल्ली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अध्यक्ष श्रीकांत कोकुलवार, अहेरी विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण येरावार, रा.काँ.पा. तालुका उपाध्यक्ष वासुदेव कोडापे यांचे तर्फे स्वागत करण्यात आले…

यावेळी एटापल्ली तालुक्यातील विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली.. एटापल्ली तालुका आदिवासी तालुका म्हणून ओडखला जातो, या तालुक्यात 80% आदिवासी वास्तव्यास आहेत, यांचा शेती हा मुख्य व्यवसाय असून शेती व्यवसायातूनच आपला उदरनिर्वाह करीत असतात. जल, जंगल, जमीन यावर आदिवासींचा अधिकार आहे, परंतु तालुक्यातील आदिवासी शेतकऱ्यांना 50-50 वर्षापासून शेतजमिनीवर स्वतःची शेती करूनही अद्याप पर्यंत शेतजमिनीचे पट्टे मिळाले नाही.

यापूर्वी जे वनहक्क जमिनीचे मोजणी करण्यात आली होती, त्यानुसार अतिक्रमण नोंद वहीत नोंद घेण्यात आली होती परंतु तालुक्यातील सेवारी, भापडा व अन्य ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून पटवारी कार्यालयाची जाळपोळ झाल्यामुळे ई-पंजी उपलब्ध नाही… अशा अनेक समस्येमुळे अद्यापही अनेक शेतकरी अतिक्रमण पट्टयापासून वंचित आहेत. त्यामुळे फेर जमिनीचे मोजणी करून परत इ-पंजी मध्ये नोंद करण्यात यावे व हक्काचे वनपट्टे देण्यात यावे अशी विनंती यावेळी आदित्य जिवने (भा.प्र.से), उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी, यांना करण्यात आली…

तसेच अनेक तलाठी मुख्यालयी राहत नसल्यामुळे शेतकऱ्यांना शेतीविषयक कागदपत्रांसाठी व शैक्षणिक दाखल्यांसाठी वन वन भटकावे लागते. करिता तलाठी, ग्रामसेवक, वनरक्षक, कोतवाल यांना मुख्यालयी राहण्यास बंधनकारक करावे. व शासन निर्णय 16 फेब्रुवारी 2018 व 17 नोव्हेंबर 2018 च्या शासन निर्णयानुसार ‘सर्वांसाठी घरे’ या धोरणाची अंमलबजावणी करावे. अशीही विनंती करण्यात आली…

यावेळी उपविभागीय अधिकारी आदित्य यांनी म्हणाले की, माझी आई शिक्षिका व वडील प्राध्यापक असून मला लहापणापासूनच शिक्षणाची आवड आहे. त्यामुळे अतिदुर्गम भागातील सर्व विद्यार्थ्यांना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी व या भागातील प्रत्येक आदिवासी विद्यार्थी अधिकारी बनावे यासाठी मी सर्वप्रथम पिपली येथील सध्यस्थितीत बंद असलेली शासकीय आश्रम शाळा पूर्वरत सुरू करण्याची कार्यवाही करीत आहे… व माझी नियुक्ती 10-15 दिवसापूर्वीच झाली असून आपल्या मागण्या संदर्भात मला काही वेळ द्या नियमानुसार आपल्या मागण्या पूर्ण करू अशी ग्वाही दिले…..

[एटापल्ली शहरात अनेक वर्षापासून घरे बांधून वास्तव्यास असलेल्या अनेक जनसामान्यांच्या त्यांच्या स्वतःच्या जमिनीवर भूधारक म्हणून “महाराष्ट्र शासन” असे नोंद आहे. अशा जमिनीचे फेर मोजणी/ तपासणी करून ती जमीन त्यांच्या स्वतःच्या नावावर करून त्यांना प्रॉपर्टी कार्ड देण्यात यावे व या विषयाकडे विशेष बाब म्हनून कार्यवाही करावे….]

error: Content is protected !!