सुकाटोला येथील नौटंकी ड्रामाचे उद्घाटन श्री रविकांत खुशाल बोपचे यांच्या हस्ते संपन्न…!

0
19
1

तिरोडा / सदानंद पटले

दि.7 जानेवारी 2024 रोजी गोरेगाव तालुक्यातील मौजा सुकाटोला(पुरगाव) येथे नवं वर्षाच्या पावन पर्वावर नौटंकी ड्रामा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन श्री रविकांत खुशाल बोपचे यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी श्री रविकांत बोपचे यांनी नागरिकांशी विविध विषयांवर चर्चा करत संवाद साधला व सर्वांना नवं वर्षाच्या शुभेच्छा देत मार्गदर्शन केले.
यासह तलाठी, इंडियन आर्मी सारख्या विविध सरकारी नोकरीत निवड झालेल्या विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. व नोकरीतील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी श्री रविकांत खुशाल बोपचे यांच्यासोबत सरपंच सौ. पुजाताई नाईक, श्री टी. बी. तुरकर, ग्रा. प. सदस्य सौ. तुलसीताई राऊतकर, श्री नामदेव नाईक, पत्रकार श्री आदेश फुले, मुख्याध्यापिका सौ. भुरे मॅडम, श्री अनिल पारधी, श्री दुर्गा ठाकरे, श्री रामचंद रहांगडाले, श्री जुमराज रहांगडाले, श्री रमेश राऊत, श्री अनिल रहांगडाले, श्री कमलेश बिसेन, विनोद रहांगडाले आदिंसह प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते.