गोंदिया / धनराज भगत
दिनांक 8/1/2024 रोज सोमवार दुपारी 12.00 वाजता जिल्हा परीषद शाळा सितेपार येथील पटांगणा वर कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक नाबार्ड अंतर्गत व श्री. गणेश ग्रामीण विकास शिक्षण संस्था गोंदिया यांचे वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात मा. अविनाश लाड DDM नाबार्ड गोंदिया, मा. विजय बाहेकार सचिव श्री. गणेश ग्रामीण विकास शिक्षण संस्था गोंदिया, व्यासपिटा वर अनेक मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचा आस्वाद खालील उपस्थित पदाधिकारी यांनी घेतला.
सर्व महिला बचत गट पदाधिकारी, सदस्य, सितेपार सहकारी सोसायटी अध्यक्ष, सदस्य ,ग्रामसेवक, बचत गट आईसीआरपी,कृषि सखी,पशु सखी,ग्रामपंचायत उपसरपंच,सदस्य ,शेतकरी , ग्रामस्थ ,आरोग्य विभाग कर्मचारी, शाळे कारी विद्यार्थी शिक्षक वृंद यांच्या उपस्थिति मध्ये सर्व प्रथम क्रांतिज्योति सावित्री बाई फुले यांच्या प्रतिमा ला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली यात ऑन लाईन कार्यक्रम च्या माध्यमातून घर के सी सी अभियान, विमा योजना,लघु उद्योग, क्रॉप लोन, पी एम किसान योजना,जीवन ज्योति योजना आणि इतर विविध शासकीय योजना बद्दल
मार्गदर्शन केले.
उपस्थित महिला बचत गट,शेतकरी,ग्रामस्थ,याना विकसीत भारत संकल्प यात्रा रथ द्वारा शासकीय योजनेची माहिती दिली.