चंद्रपूर /प्रतिनिधी
दिनांक ७ जानेवारी २०२४ रोजी
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चंद्रपूर मुख्य शाखा सभागृह सिव्हिल लाईन चंद्रपूर येथे शिक्षक सहकार संघटना महाराष्ट्र राज्य शाखा चंद्रपूरच्या सौजन्याने चंद्रपूर जिल्हा गुणवंत शिक्षक, राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार, व शिक्षक -शिक्षण विशेषांक प्रकाशन सोहळा पार पडला. सदर कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार किशोर भाऊ जोरगेवार हे होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष संतोष पीठ्ठलवाड राज्य अध्यक्ष शिक्षक सहकार संघटना हे होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सुधाकर अडबले व इतर मान्यवरांनी हजेरी लावली होती.डॉ. नंद कुमार राऊत अवर सचिव महाराष्ट्र शासन, उपशिकणाधिकारी ठाकरे मॅडम यांनी शिक्षण आणि वैद्यनिक दृष्टीकोन वर मार्गदर्शन केले.चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष जुमले सर यांनी कार्यक्रमाचे उत्तम आयोजन केले.यावेळी “शब्द शिल्प” या कविता संग्रहाचे विमोचन (कवी रवींद्र अंबुले )सुद्धा करण्यात आले.गोंदिया जिल्ह्यातील शिक्षकांनी सुद्धा कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवत सेवेंद्र रहांगडाले,सुरेंद्र गौतम जिल्हा अध्यक्ष गोंदिया, गुलाब बिसेन, राजू वरखडे , उईके सर , संध्या अंबुले, संतोष बिसेन, बनसोड सर,हत्तीमारे सर यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली..