जिला प्रतिनिधि माइकल मेश्राम
9881664865
सालेकसा — समाजाच्या विकासात पत्रकारांची भूमिका फार महत्वाची असून अनेक गोष्टींचा गूढ उलगडण्यात पत्रकार नेहमी अग्रणी असतो.असे प्रतिपादन सालेकसा येथील सामाजिक कार्यकर्ते ब्रजभूषन बैस यांनी केले. ते सालेकसा येथे पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्षीय भाषणात बोलत होते.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ सालेकसाच्या वतीने सालेकसा येथे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती पत्रकार दिन म्हणून साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते ब्रजभूषन बैस होते. प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्ते सुनील असाटी, हरिश बहेकार, डॉ. प्रमोद गौतम, डॉ. नरेन्द्र नागपुरे, मायकल मेश्राम, संजय बारसे,मुलचंद कथलेवार, प्रशांत प्रधान, दिक्षित शिवणकर व मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मांडताना प्रा. गणेश भदाडे यांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाला इतर मान्यवरांनी संबोधित केले.
कार्यक्रमाचे संचालन राकेश रोकडे यांनी केले तर आभार प्रदर्शन विजय मानकर यांनी केले.