आपला विदर्भगोंदिया

आमदार सुनील कांबळे वर कारवाई करा – जयश्री पुंडकर

♦️ कर्तव्यावर असलेल्या पोलीस जवानाला कानशिलात मारल्याबद्दल

गोंदिया / धनराज भगत

ससून रुग्णालय पुणे येथे दिनांक 5 जनवरी 2024 रोजी तृतीय पंथीयांच्या साठी विशेष वार्ड तयार करण्यात आला असून त्याचा उद्घघाटन राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजित दादा पवार यांच्या हस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमात पुण्याचे आमदार सुनील कांबळे ही उपस्थित होते पण त्यांचे नाव उद्घघाटन फलकावर नसल्यामुळे नाराज होऊन ते कार्यक्रमाच्या व्यासपीठावरून खाली उतरत असताना कर्तव्यावर असलेल्या पोलीस जवानाच्या कानशिलात मारली.

हा अधिकार ह्या सत्ताधारी आमदाराला कोणी दिले ? माननीय गृहमंत्री याच्यावर कारवाई करणार का ? सदर घटनेचा निषेध करीत महाराष्ट्र पोलोस बाईज संगठन ने चे संस्थापक अध्यक्ष राहुल दुबाले यानी जिलाधिकारी बिड याना सदर घटनेचा निवेदन सादर करुन आमदार सुनील कांबले वर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. आमदारा वर गुन्हा दाखल झाला असून आता त्यांच्यावर तत्काळ कारवाही करण्यात यावी अशा प्रकारचे निवेदन आज दिनांक 8 जनवरी 2024 रोजी उपजिल्हाधिकारी माननीय स्मिता बेलपात्रे जिल्हा गोंदिया यांना संघटनेच्या विदर्भ अध्यक्ष जयश्री पुंडकर यांनी दिले आहे.

यावेळी जिल्हाध्यक्ष राहुल वंजारी, सचिव वंदना बैस, उपस्थित होते. सदर आमदारावर कारवाई नाही झाल्यास महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना विदर्भात आमदार सुनील कांबळे यांच्या विरोधात मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरेल याची शासनाने दक्षता घ्यावी.

error: Content is protected !!