राज्यस्तरीय रोलर स्केटिंग स्पर्धेत वीरश्री ची निवड

0
91

गोंदिया / धनराज भगत

4 जानेवारी 2024 ला विभागीय क्रीडा संकुल मानकापुर इथे विभागीय शालेय रोलर स्केटिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर भंडारा, वर्धा या जिल्ह्यानी सहभाग नोंदविला. के के इंग्लिश प्रायमरी स्कूलच्या वीरश्री चुटे या विद्यार्थिनीने उत्तम कामगिरी या स्पर्धेत तृतीय क्रमांक प्राप्त केला. वीरश्रीची निवड राज्यस्तरीय शालेय रोलर स्केटिंग स्पर्धे करिता करण्यात आली.

वीरश्रीने आपल्या यशाचे श्रेय संस्थेचे कार्यकारी डॉ संघी सर, मुख्याध्यापिका रिना भुते मॅडम व आई वडिलांना दिले. शाळेच्या सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी वीरश्रीला पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या.

Previous articleपोवार (पंवार )समाज भाई बहनोंसे आदरपुर्वक अनुरोध…..
Next articleप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत बंधनकारक केलेल्या बाबींची पुर्तता करावी