आपला विदर्भचंद्रपूर

सत्ता संघर्षाच्या निकालानंतर गोंडपिपरीत (शिवसेना)ठाकरे आक्रमक : केंद्र व राज्यसरकारचा निदर्शने करत निषेध आंदोलन

धर्मपाल कांबळे/जिल्हा प्रतिनिधी

गोंडपिपरी – राज्यातील सत्ता संघर्षावर निकाल देताना शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच असल्याचा निर्वाळा विधानसभा अध्यक्षांनी दिला.अपात्र प्रकरणाच्या निकालावर गोंडपिपरीत शिवसेना(ठाकरे) पदाधिकारी कार्यकर्त्यांनी शिवाजी चौकात संताप व्यक्त करत निदर्शने केले.
मूळ प्रकरण हे अपात्रतेचे होते.पण राहुल नार्वेकर यांनी कोणालाच अपात्र केले नाही.शिवसेना(ठाकरेंची)घटना ग्राह्य धरले नाही तर आमदार अपात्र का नाही..? पक्षाची घटना चालत नाही तर एबी फॉर्म कसा चालला.गोगावले चां व्हीप योग्य तर कुणीच अपात्र कशे नाही.नार्वेकराणी दिलेला निर्णय लोकशाहीची हत्या आहे.शिवसेना कुणाची लहान मुलंही सांगू शकतात.अशा भावना व्यक्त करत विधानसभा अध्यक्ष महाराष्ट्र सरकार व दडपशाही करणाऱ्या केंद्रसरकार विरोधात (ठाकरे) गट आक्रमक होत जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांच्या मार्गदर्शनात जिल्हा उपप्रमुख संदीप करपे यांच्या उपस्थितीत.शिवसेना तालुकाप्रमुख सुरज माडूरवार यांच्या नेतृत्वात आंदोलन करत दिलेल्या निकालाचा दि.(११) गुरुवारी दुपारी १ वाजता निषेध करण्यात आला.यावेळी तालुका संघटक शैलेश बैस,शहर प्रमुख रियाज कुरेशी,युवासेना तालुका प्रमुख तुकाराम सातपुते,शहर उपसंघटक अशपाक कुरेशी,तालुका उपसंघटक नरेंद्र इंगोले, बब्बु पठाण,बळवंत भोयर,युवासेना तालुका उपप्रमुख गौरव घुबडे, तमुस अध्यक्ष संदीप लाटकर,जोगापुर शाखा प्रमुख पंकज डांगी,आकसापुर शाखा प्रमुख दर्शन वासेकर.पेलुर शाखा प्रमुख स्वप्निल नागापूरे, तारसा शाखा प्रमुख अमोल कुकुडकर,विपिन मोरे,वढोली शाखा प्रमुख राहुल मेकरतीवार, श्रीधर मुंजनकर,विशाल वाघाडे, ॲडवोकेट उराडे,नबात सोनटक्के,प्रदीप देवाडे,कार्तिक बटे,छोटू अलोने,भगवान आभारे,धनराज पिपरे,अमित नेवारे,राहुल चांदेकर,मयुर चिचघरे, इंद्रपाल वासेकर,समीर सातपुते,साहिल वासेकर,लोकेश सिडाम,युवराज बुरांडे,रोहित कोडपे,दीपक कुळमेथे यांच्यासह शेकडो पदाधिकारी शिवसैनिकांची उपस्थिती होती.

error: Content is protected !!